वर्धमनेरी गावातील एका हाफशीचे आत्मकथन wardhamaneri


 Vidarbh tiger news, 

                 आर्वी वर्ध्यातील वर्धमनेरी या गावातील एका हाफशीचे आत्मकथन सादर करत आहे. 

   तत्पूर्वी आपण या हाफशीविषयी काही जाणून घेऊया, हि हाफशी वर्धमनेरी तील वर्धमनेरी पुनर्वसन या ठिकाणी हि हाफशी आहे. 

           हे  वर्धमनेरी पुनर्वसन वर्धमनेरी बस स्थानक च्या अगदी अर्धा किलोमीटर आहे. 

          हे वर्धमनेरी पुनर्वसन पहिले अप्पर वर्धा नावाने संबोधले जायचे. 

          वर्धमनेरी हे आर्वी तालुक्यात येते आणि जिल्हा वर्धा आहे. 

          चला तर आपण हाफशीचे आत्मकथन जाणून घेऊया. काय आहे या आत्मकथना मध्ये. 

           ' जेव्हा तुमच्या गावात हाफशी नव्हती त तुम्ही सरकार ला माझी विनंती केली होती ना. आणि दररोज माझ्यापासून तुम्ही पाणी भरायचे. खुप माझ्या पाण्याचा दुरुपयोग केला(हाफशी ). चार पाच डाव माझा पाणी वळायचा दांडा मला मारू मारू तोडला. तेव्हा मला किती त्रास झाला असेल. 

           मग तुम्ही नवी दांडा आणून मला लावला. व हफसायला सुरवात केली. दररोज पाणी भरायला सुरवात केली. दररोज माझ्या जवळ कपडे धुवायला यायचे. तेव्हा पाण्याची आवश्यकता असली कि यायचे तुम्ही पाणी भरायला. 

        पण आता तुम्ही मला विसरले तुम्ही मला लावारीस सोडलं. आणि माझ्या कडे लक्ष पण देत नही. आता माझी पाण्याची पातळी मध्ये काही समस्या आली म्हणून तुम्ही लक्ष देण सोडून दिल. काय लोक आहे तुम्ही. 

         कोणीही मला दुरुस्त पण करत नाही. कोणी तक्रार पण करत नाही. तुमच्यासारखे लोक कुठं पहिले नाही. एका मेका चे वाट तुम्ही लोक  पाहत राहता पण तुम्हच्यामधल्या कोणीही  माझा दुरुस्त करण्याचा अर्ज करत नाही. असे तुम्ही लोक आहे (हाफशी ). 

           आणि सरकार पण लक्ष देत नाही.. मग कश्याला माझी उत्पत्ती केली. जंग लागून मरण्यासाठी ठेवलं का.? विचार करा जरा. 

          मी मनातल्या मनात रडत राहते तुमची वाट बघत राहते. कि कोणीतरी माझ्याकडे लक्ष देईल. व मला नवीन जीवन देईल.. 

            जेव्हा तुम्ही मला जिवंत ठेवाल तेव्हा तुम्ही लोक जिवंत राहाल. 

 बस इथलं बोलून थांबते तुमची जीवनदायिनी एक पाण्याचा स्रोत हाफशी.. 

  ***************************************

    लेख आवडला असेल त follow करा आणि मित्रांना पाठवा. 

*****************************************


बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर संपर्क करा. 

******************

Comments