Vidarbh tiger news,
Arvi/wardha,
टाकरखेड येथे पौर्णिमा निमित्त धम्मपरिषद संपन्न
आर्वी तालुक्यातील टाकरखेड या गावी पंचशील बुद्धविहार समिती टाकरखेड, निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वीच्या संयुक्त विद्यमाने मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त्याने एक दिवसीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.
या निमित्त्याने आदरणीय भंते करुणाकीर्ती थेरो भंते नागीत बोधि, आदरणीय भंते धम्मरत्न आदी भिक्खू संघाच्या उपस्थितीत
धम्म ध्वजारोहन बुद्धवंदना परीत्त सुत्त पठण पार पडले.तर धम्म प्रवचन डॉ. सुनंदा कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
प्रा प्रवीण कांबळे निळाई परिवार नागपुर तर प्रमुख अतिथी धम्मप्रचारक सुरेश भीवगडे विनोद पायले , सुरज मेहरे , सुर्यकांत मुनघाटे
सुरेश वंजारी, रंगराज गोस्वामी, मनोहर गजभिये, ज्योति नाईक, सचिन मनवरे, दिगांबर चनकापुरे,छत्रपाल तामगाडगे, डॉ. सुनंदा रामटेके, सुविद्या सातपुते, जगदिश राउत
दिंगाबर चनकापुरे
संघर्ष नाईक बंडू पाचोडे, पांडुरंग भरोसे, अक्षय भगत सचिन मनवरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्रीलंका भूमीत बुद्धगयेचा बोधिव्रुक्ष घेऊन धम्मविचार पोहचवीनारया महान धम्मप्रचारिका ठरलेल्या अर्हंत थेरी संघमित्रा यांना अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी धम्मरेलीचे आयोजन करण्यात आले होते.
सोबतच निळाई सामाजिक सांस्क्रुतिक परिवार नागपूरच्या वतीने आंबेडकरी आंदोलनाची कविता सादर करण्यात आली या कवी संमेलनचे अध्यक्ष सूर्यकांत मुनघाटे होते या कवी संमेलना चे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले यात 15 कवींनी सहभाग घेतला.
याप्रसंगी टाकरखेड येथील पंचशील बुद्धविहार समिति, अरुण भुरभुरे, विनोद डोमे, कैलाश भगत, उज्ज्वला जवंजाळ, रत्ना भुरभुरे राजपाल अघम, रवी भुरभुरे, वीक्की डोंगरे शुभम जवंजाल, निकिता अघम, अमिषा भुरभुरे, रुतुजा थोरात, वंदना भुरभुरे, प्राजक्ता भुरभुरे, आदी सहयोग दिला.
'__________&____________||||||____________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क साधावा...
Comments
Post a Comment