माझा बाप क्रिकेटर या कविता संग्रहाच्या निमित्त्याने

 Vidarbh tiger news,

                   Arvi/wardha,

                        वर्तमानपत्राकरिता...

*माझा बाप क्रिकेटर या कविता संग्रहाच्या निमित्त्याने*

अंधारात जीवनाला 

दशा ही अशी आली

वंदनीय पशु परंतु 

आम्हीच पाया खाली 

विद्रोही मनात पेटल्या 

क्रांतीच्या मशाली 

तुमच्या मुळेच बाबा 

आमची पहाट झाली

कवी मनोहर गजभिये यांचा माझा बाप क्रिकेटर हा कवितासंग्रह अलीकडेच निळाई प्रकाशन नागपूरच्या वतीने प्रकाशित झाला आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सादर समर्पित करण्यात आला असून एकूण 50 कविता या संग्रहात आहे.

या कविता संग्रहाला डॉ मनोहर नाईक यांनी प्रस्तावना दिली आहे 

प्रा. प्रवीण कांबळे यांनी संपादकीयमध्ये पि. बाळूच्या मानपत्राचा उल्लेख करत आंबेडकरी इतिहासाला उजाळा दिला आहे

'माझा बाप क्रिकेटर' हे शीर्षकच सर्वाना विचार करायला लावते पण आपल्या शेतकरी बापालाच क्रिकेटर म्हणून आपल्या वडिलांच्या कष्टाचे मोल व्यक्त केले आहे.

भारतीय क्रिकेट टिमपेक्षा माझ्या बापाची टिम महान आहे

असे कवी म्हणत असताना

सुगीच्या दिवसात शेतातील पीक पोत्यात भरून घरी आणताना माझ्या बापाचा आनंद काळजात दाटते 

त्याला वर्ल्डकप जिंकुन आणल्या सारखा वाटते

आनंदाच्या भरात तो चावडीवर जाऊन बसते 

सोबतीला डोळ्यातील अश्रू ही त्याची शम्पेन असते

ही त्याची शम्पेन असते.

या कवितेतून आजच प्रखर वास्तव मनोहर गजभिये यांनी मांडले आहे

वर्तमान जीवनात दिल्ली येथे जे शेतकरी आंदोलन सुरू आहे

त्याच अनुषंगाने हि कविता आहे.

'जीवनप्रवास' या कवितेने या कविता संग्रहाची सुरवात होते अमर संदेश बुद्धाचा घेऊन जीवन प्रवास सुरू आहे क्रांती सूर्यामुळे हे नवजीवन प्राप्त झाल्याची जाणीव कवीला आहे

आपल्या कवितेला बुद्धगया महू दीक्षाभूमी चैत्यभूमी प्रेरणा घ्यायला सांगते

 संत कबीर यांचे दोहे, ज्योतीबाची गुलामगिरी शाहू महाराजांचे आरक्षण सयाजीराव यांचे प्रोत्साहन अधोरेखित करणारी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी तथागतांचा धम्म प्रसारित करण्यासाठी प्रेरणा देणारी कविता 

म्हणजेच तू माझ्याकडे येताना

कविता तू माझ्या लेखणीचा हात धर तुझ्या साक्षीने मांडायची आहे अन्याय अत्याचाराची व्यथा तथागत बुद्ध व त्यांच्या धम्माची गाथा 

सम्राट अशोकाची परिवर्तन कथा 

आणि तुझ्याद्वारे ..

लिहायचा आहे नवा इतिहास 

डॉ बाबासाहेबांच्या स्वप्नाचा संपूर्ण भारत प्रबुद्धमय करण्याचा.

याच कवितासंग्रहातील दीक्षाभूमी हि कविता

शुभ्र वस्त्रांनी फुललेली दीक्षा भूमी आशाळभुत निळ्या पाखरासहित

प्रज्ञासूर्याचे तथागत बुद्धाला शरणं नवा इतिहास नवा शुभारंभ. 

कवी मनोहर गजभिये दीक्षाभुमीला समता मुलक प्रेरणेचे प्रतिस्वरूप मानतो.

या कवितासंग्रहात कवींनी आजच्या डिजिटल युगातील संकल्पना घेऊन काही काही कविता केल्या आहेत

यातील आधारकार्ड हि कविता आंबेडकरवाद स्वीकारायला सांगते 

म्हणून म्हणतो बा स्वातंत्र्या!...

आता तू आपला आधार कार्ड काढून घे

त्यावर आंबेडकरवादाचा पत्ता लिहून घे 

काय चाललं देशात? 

या कवितेतून सध्याची वर्तमान परिस्थिती विशद केली आहे

लोकशाहीचे प्राण भांडवलीच्या घशात

प्रश्न असा रोज पडतो काय चाललं देशात 

या कविता संग्रहात कवी भारत देशाच्या विचार करत असताना म्हणत आहे की, 

हजारो वर्षात कचरा देशात कोणी केला?

प्रबुद्ध देश होता, रसातळाला कोणी नेला?

या सर्व प्रश्नाचा विचार आता झाला पाहिजे 

विज्ञानवादी भारत जगापुढे आला पाहिजे 

ठिय्या हि कविता मजुरांच्या जीवनाची व्यथा सांगते तर विकास हि कविता आर्थिक विकासावर भाष्य करते 

 कवी मनोहर गजभिये आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देताना सांगतो की,

बापानं दिलेली लेखणी हातात घेऊन 

भारतीय संविधान डोह्यात ठेवून 

एक एक माणूस जोडत जाऊ

वर्तमान अंधाराशी लढत राहू

या कवितासंग्रहात परिवर्तन हि कविता व्यवस्थेला प्रश्न करायला सांगते कारण

"जे आंधळे, बहीरे, मुके आहेत

जे कधी प्रश्न करीत नाही

स्वतःचे स्वतःला..... "

आजच्या काळात कोरोनाने कहर केला असताना मात्र कवी ' 'कोरोना एक संदेश' घेऊन सांगतो

कोरोना पासून काही शिकलं पाहिजे

मानव अस्तित्व टिकल पाहिजे

विज्ञानाशिवाय दुजा मार्ग उरत नाही

विज्ञानापेक्षा दगड श्रेष्ठ ठरत नाही 

या कविता संग्रहातील शेवटची कविता समाजासाठी काहीतरी करावे समाजाचा आधार व मेल्यावर आपलेही स्मरण राहावे असे सांगते एकूण हा कविता संग्रह वाचनीय आहेवर्तमानपत्राकरिता...

या कविता संग्रहातील शेवटची कविता समाजासाठी काहीतरी करावे समाजाचा आधार व मेल्यावर आपलेही स्मरण राहावे असे सांगते एकूण हा कविता संग्रह वाचनीय आहे.

✒️सुरेश किसनराव भिवगडे

ग्रंथपाल, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी

8308913115.

✒️सुरेश किसनराव भिवगडे

ग्रंथपाल, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी

8308913115

************"*****************************

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.

Comments