आर्वी येथे " राष्ष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा ( MPSC) या विषयावर मार्गदर्शन


 Vidarbh tiger news,

आर्वी/वर्धा,

                आज दिनांक 24/01/2021, "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निशुल्क अभ्यासालय" वसंत नगर, आर्वी येथे " राष्ष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा ( MPSC) या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक कु. भाग्यश्री नागपुरे ( MPSC ASPIRANT) होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. विजया मुळे ( संचालिका: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निशुल्क अभ्यासालय) यांनी केले. सुरवातीला मुलींनी आपला परिचय देऊन मला mpsc करायचे आहे, कुणी म्हणाल्या की मला PSI बनायचे आहे. त्यानंतर भाग्यश्रीने स्पर्धा परीक्षा,

mpsc म्हणजे काय? Mpsc अंतर्गत येणाऱ्या विविध पोस्टिंग कोणत्या, त्याचा syllabus काय आहे, पेपर पॅटर्न, आवश्यक बुक लिस्ट, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, किती वेळ अभ्यास करावा, त्याचा वेळ कसा निश्चित करावा, संयम ठेवणे गरजेचे आहे, सर्व कार्यक्रम , सोसियल मेडिया पासून दूर राहणे, अभ्यासात सातत्य ठेवणे, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल कसा असतो, तसेच लोकसत्ता पेपर वाचताना कोणती माहिती किंवा पान महत्वाचं असत , वाचन कसे करावे, पेपर सेट कधी वाचावा या सर्व विषयावर योग्य असे मार्गदर्शन केले, मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्याचें समाधान केले. आजचा कार्यक्रम ग्रामीण मुलींनसाठी उपयुक्त होता कारण नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? याबद्दल सर्व उलगडून सांगण्यात आले. 

या कार्यक्रमाचे संचलन कु. प्रीती शिवरकर हिने केले , दर्शना तांबेकर हिने तिचे अनुभव व स्वतःवर विश्वास ठेवून या स्पर्धे मध्ये उतरायला पाहिजे असे विचार व्यक्त केले. कु. ऐशवर्या सयेमबेकर हिने आजच्या आयोजित कार्यक्रमाचे आणि कु. भाग्यश्री हिचे मनपूर्वक आभार मानले, तसेच उपस्थित सर्व मुलींचे पण आभार मानले, शेवटी प्रा. विजया मुळे यांनी कु. भाग्यश्री हिचे अभिनंदन करून " मी सावित्री " प्रा. यशवन्त मनोहर लिखित पुस्तक भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 💐💐💁🏻‍♀️💁🏻‍♀️📖📖✒️✒️

______________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.

______________________________________________

Comments