Vidarbh tiger news|poem.
/**दिन तो पर्यावरणाचा **/
दिन तो पर्यावरणाचा वसा उचलला तू सृष्टी पेटविण्याचा लाऊनी वृक्ष दारो दारी कर निर्धार पर्यावरण वाचविण्याचा...!!
घेऊनी माझ्या पोटी जन्म
माझाच जीव घेण्यावर तू उठला
हे मानवा चुकी झाली माझी की मी तुला सुंदर जग पाहण्याचा मौका दिला...!!
करुनी वृक्ष तोड घेऊनी प्राण्यांचा जीव
फासला जातोय जगत सृष्टीला फास
स्वतःच्या स्वार्थासाठी हे मानवा
का बरं रे करतोय पर्यावरणाचा ऱ्हास...!!
नसतील झाडे निसर्गात
तर कसा घेशील तु मोकळा श्वास
मातीत मिळेल आयुष्य तुझं अन् प्राणी मात्रांनासुध्दा नाही मिळणार सुखाचा घास...!!
देण ही माझीच (निसर्गाची)
की तुझ्या कुटुंबात दरवळतोय सुगंधी फुलांचा वास तर तुझा सुखी संसार जाईल दुःखास...!!
करशील झाडांच्या कत्तली
अजुनही वेळ नाही चुकली
लाव वृक्ष व कर सृष्टीचे जतन
बघ एक दिवस नक्कीच
धरती माता करेल तुला वंदन...!!
!!! झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचा न्हास वाचवा !!
•कवी:-अनुराग अ. हाडके.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा . ...
Corona एक जागतिक लुटमारी👇👇👇
______________________________________________
Comments
Post a Comment