Vidarbh tiger news,
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे कोविड -१ ९ वर ऑनलाईन मार्गदर्शन*
चिस्तूर(आष्टी/वर्धा) :- *प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे कोविड -१ ९ वर ऑनलाईन मार्गदर्शन*
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . देशभरात त्याचे परिणाम विद्रूप दृश्य लोकांच्या समोर महामारीचे संकट म्हणून उभे झाले आहे . अशातूनच लोकांचा लसी बाबत विश्वास आणि मनोबल तथा आपली सुरक्षा कशी करता येईल यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर कोरोना पासून स्वतःची सुरक्षा आणि जागृती मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले . अशा कार्यक्रमाची जपश्रळपश बैठक संपूर्ण देशभरात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कराना आपली सुरक्षा या नावाने घेतल्या जात आहे . नुकतेच वर्धा, अमरावती ,नागपूर येथील आष्टी , आर्वी , कारंजा, काटोल,तिवसा, चांदुर बाजार , चांदूररेल्वे तालुक्यात देखिल ही जपश्रळपश बैठक संपन्न झाली . आष्टी , आर्वी , कारंजा, काटोल,तिवसा, चांदुर बाजार , चांदूररेल्वे या तालुक्यातील ५० गावामधील सरपंच , ग्रामसेवक , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका ,
पोलीस पाटील , महिला बचत गटाच्या प्रमुख आदी मान्यवर आणि ५० गावातील स्वयंसेवक सुद्धा उपस्थित होते . या सभेला मार्गदर्शक म्हणून मुंबई तेथील तज्ञ मा . निकम मा श्रुती बनसोडे मॅडम व कोमल रासकर यांनी गावातील लोकांनी स्वतःची सुरक्षा आणि घ्यावयाची दक्षता तथा सुरक्षित लस व महत्व , लस नोंदणी कशी करावी तसेच लसीबाबत असलेले गैरसमज दूर करुन लस घेण्याबाबत आव्हान केले . सॊळव १ ९ वर सखोल मार्गदर्शन केले . तसेच लोकांचे मनोबल आणि लसी बाबतचा विश्वास कायम राहणार यासाठी प्रथमचे मेंटोर लीडर मा . मा प्रदीप कोरडे सर यांनी माहिती दिली . तर प्रसंगी आष्टी तालुक्याचे मेंटोर मा . आशिष मडघे यांनी बैठीकीचे रुपरेषा प्रास्ताविक करुन केली . काटोल आणि चांदुर रेल्वे मेंटोर मा भीमराव सहारे व पंकज अहिरे सर वे सहयोगी
तसेच इतर मेंटोर सुद्धा उपस्थित होते . सभेला सर्व स्टेक होल्डर ग्रामवासी यांनी आपली शंका व गैरसमज असलेले प्रश्न विचारत समाधान करुन घेतले . कार्यक्रमाची सांगता म्हणून आष्टी तालुक्याच्या मेंटोर आशिष मडघे यांनी सर्वांचे आभार मानले .
_____________________________________________बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Comments
Post a Comment