Best poem in marathi|कसे हो साहेब हे वाईट दिवस आले|कवी:- अनुराग हाडके


 Vidarbh tiger news


कसे हो साहेब हे वाईट दिवस आले


आमच्या सार्या स्वप्नांच वाठोड करुन गेले...।।


आहो आम्ही मजुर करतो मोलमजुरी


पोटाची खडकी भागविण्यासाठी आलो तुमच्या शहरी ...।। घेऊनी अनेक स्वप्न ऊराशी,


हाकला कष्टाचा रणगाडा


आल कसलं हे कोरोणाच सावट,


क्षणार्धात केला त्यांचा चुराडा...।।


शासन म्हणतो करा मजुरांची मदत


पण ठेकेदार कसला वाईट


म्हणतो कंत्राट संपलंय आता


तुम्हा सोडावी लागेल आमची साईट...।।


सार शहर बंद पडलय


आता काय करायच राव..?


केला म्हणी निश्चय


आता पायीच गाठायच गाव...।।


आम्ही बांधल्या कित्तेक ईमारती


त्यात अनेकांचा संसार आहे सुखात वेळ ठरली आमचीच वाईट


अन् आम्हीच पडलो दुखात... ।।


पाय फुटले तरी चालेल मी


मला पर्वा नाही त्याची


निश्चय आहे द्रुढ माझा


मला पाहायची दशा गावाची...।।


कसे हो साहेब हे दिवस आले


आमच्या सार्या स्वप्नांच वाठोड करुन गेले...।।


कवी:-अनुराग हाडके

_____________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.

Corona एक जागतिक लुटमारी👇👇👇



Comments