एक सुंदर कविता|सर्व भावांना समर्पित|कवी अनुराग हाडके


 Vidarbh tiger news|शोध कवितेचा.

       सर्व भावांना समर्पित

 भाऊ धाकटा असो वा थोरला भाऊ तो भाऊच असतो ,

सुखा दुःखात लाभलेला भक्कम असा बाहू असतो भाऊ कधी भावावर प्रेम दाखवित नसतो पण त्याच्या हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाचा जसा पसाराच असतो 

अडचण कोणतीही असो हक्काने खांद्यावर हात ठेवत " टेन्शन मत ले तेरा भाई है ना " असं म्हणणारा फक्त भाऊच असतो 

सख्खा असो वा चुलत भावा - भावात फरक कधीच नसतो संकट कालीन परिस्थितीत भाऊच भावाच्या मदतीला असतो 

धाकट्यांच्या आनंदासाठी तळजोड करण्यास कधीच कमी नसतो 

तुम्हाला सांगू भाऊ हा जणू दुसरा पिताच असतो म्हणून भाऊ धाकटा असो वा थोरला भाऊ तो भाऊच असतो सुखा दुःखात लाभलेला भक्कम असा बाहू असतो - 

कवी :- अनुराग हाडके.

_____________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..

Comments