Vidarbh tiger news|wardha
*शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे जिल्हाधिका-यांना निवेदन*
वर्धा:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांंसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन देण्यात आले.
विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. शेती कशी करावी?असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. शेतीचा हंगाम जवळ आला असून यावर्षी शेतीसाठी पोषक असा मान्सूनही उंबरठ्यावर येऊन ठेपला असतांना शेतकरी हतबल झाला आहे आणि शासकीय मदतीची वाट पाहत आहे. मागीलवर्षी घेतलेले कर्ज दुष्काळामुळे परतफेड करु शकलेला नाही. यंदाही शासनाने बि-बियाण्यांचे व रासायनिक खतांचे भाव दामदुप्पटीने वाढवले असल्याने त्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा झाला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंत्रकार संघाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी वर्धा यांना खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
१.क्रुषी कर्ज पुनर्गठन:-मागील वर्षी झालेल्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज परतफेड करु शकले नाही. त्यामुळे क्रुषी विभागाने ही बाब गंभीरतेने घेऊन यावर्षी क्रुषी कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा.
२.जिल्हा अग्रणी बंँक वर्धा :जिल्ह्याच्या अग्रणी बँकेला आदेश देऊन इतर बँकांनी शेतकऱ्यांना यंदा कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करावी असे त्वरीत आदेश देण्यात यावेत.
३.नियमित कर्जाची व्यवस्था-जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना नियमित कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्वच बँकातून शेतकऱ्यांना नियमित कर्ज मिळण्यात यावे अशी व्यवस्था करावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुंभारे, पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत,दैनिक बहुजन सौरभ तालुका प्रतीनिधी रोशन कांबळे, दै.बहुजन सौरभ सेवाग्राम प्रतिनिधी,प्रदीप कांबळे, दिपक हुके आदी उपस्थित होते.
___________________________________________
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..
Comments
Post a Comment