Vidarbh tiger news|poem.
🙏 *कोरोनामुळे बंद असलेल्या शाळेच्या मनातील भाव संवेदनशीलपणे कवी.प्रा.दर्शनकुमार चांभारे यांनी ,
👉 *वाट पाहते शाळा...!👈 या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न...*केला आहे.
🙏 *आवडल्यास होऊ द्या मग वायरल..*
कविता
*वाट पाहते शाळा...!*
फक्त किलबिल पाखरांची तसाच पुसुनी आहे फळा... त्या चिमुकल्या लेकरांची आज वाट पाहते शाळा...
कुणीच येत नाही, ना खांद्यावर कुणाच्या ओझ दप्तराच.... प्रश्नच झाली शाळा, उघडेल कधी तिच्या दार उत्तराच...
घड्याळीचा सेल संपला, शाळेची वेळ थांबली आहे... कॅलेंडर तेच आहे, पण तेवढी फक्त तारीख लांबली आहे...
दिवाळी संपली उन्हाळ्याच्या, इतक्या सुट्या नसतात बाळा... त्या चिमुकल्या लेकरांची आज वाट पाहते शाळा...
कवडसा तेवढा एक सोबती बाकी प्रकाश मंद आहे... सर्व खुलतात कधीकधी शाळा तेवढी बंद आहे....
आठवणीने व्याकूळ साचले शाळेच्या डोळ्यात पाणी... उद्याच्या भविष्यासाठी उभी शाळा एकटी विराणी...
कमजोर झाले धागे आता, तुटतील आतुरतेच्या माळा... त्या चिमुकल्या लेकरांची आज वाट पाहते शाळा...
कवी:-प्रा.दर्शनकुमार चांभारे, (९३७३०९२३४०) रा. माटोडा(बे), ता. आर्वी, जि. वर्धा
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा
Comments
Post a Comment