Vidarbh tiger news|poem
कविता|मी आणि पुस्तक|कवी: अनुराग हाडके|vidarbh tiger news|poem
* मी आणि पुस्तक*
असताना तान्हा नव्हती अक्षरांची जान होत गेलो मोठा तेव्हा हाती आले पुस्तकाचे पान..!!
वाचताना बाराखडी डोक्यात फुटायची होती अक्षरांची रोपे पण शिक्षकांच्या साहाय्याने पुस्तक वाचने झाले सोपे..!!
पुढे वर्ग वाढत गेले आणि लागला मला पुस्तकांचा छंद वाचतांना पुस्तकं मी होत गेलो त्यात बेधुंद...!!
वाढत्या वयात समजल, असते पुस्तकाच्या पानापानात ज्ञान मग वाचत गलो पुस्तके आणि केले डोक्यात ज्ञानाचे उद्यान...!!
माझ्या मनात पुस्तकाचे स्थान अति पवित्र म्हणुनच केले मी पुस्तकाचे माझे मित्र...!!
आला मला शहानपणा होता त्यात पुस्तकाचा मोठा वाटा.. त्याचाच जोरावर मी ऊभा केला ज्ञानाचा मोठा फौजफाटा...!!
वाचुनी पुस्तकं व्हाल जीवनात समाधानी अन्यथा आयुष्यभर राहाल अडानी व अज्ञानी...!!
कवी- अनुराग हाडके.
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Must watch and subscribe my channel 👇👇
Comments
Post a Comment