Vidarbh tiger news| wardha,
*२६ जूनच्या जनआंदोलन व आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन*
वर्धा:२६ जुन २०२१ रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीदिनी पदोन्नतीमधील आरक्षण वाचविण्यासाठी जनआंदोलन व आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागासवर्गीयांचे दिनांक ७/५/२०२१ च्या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेले ३३% आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाच्या १७/५/२०१८ व ५/६/२०१८ च्या आदेशान्वये मा.न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून पदोन्नती देण्यात यावी.मंत्रीगट समितीच्या अध्यक्षपदी असलेले अमागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना निष्कासीत करून मागासवर्गीय मंत्री यांची नियुक्ती करावी या प्रमुख मागणीसह १९ अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्तरावर ८० संघटना एकत्र येऊन आरक्षण हक्क क्रुती समितीच्या बँनरखाली जन आंदोलनाची पूर्व तयारी सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यातील प्रमुख संघटना आणि समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांना सोबत घेऊन मोर्चाची जोरदार तयारी सुरू केली आहे.
स्वतंत्र गवंडी मजदूर युनियन वर्धाच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समन्वयक इंजि.अनिल खडसे,धर्मपाल ताकसांडे, गजानन थुल,डॉ. गजानन सयाम,इंजि.ज्ञानेश्वर खैरे, प्रशांत रामटेके यांनी संबोधित केले.
या जनआंदोलन व आक्रोश मोर्चाला यशस्वी करण्याचा संकल्प स्वतंत्र मजदूर युनियन,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ,गवंडी बांधकाम मजदूर युनियन,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना,महावितरण व महापारेषण संघटना,आँल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन,आदिवासी क्रुती समिती, बानाई,प्रजासत्ताक शिक्षक संघटना,बामसेफ, रिपब्लिकन पार्टी,सम्बुद्ध महिला संघटन,स्वतंत्र समता शिक्षक संघ,समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा,बहुजन समाज पक्ष,स्वतंत्र औद्योगिक अस्थाई कामगार संघटनांसह अनेक समविचारी संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.
मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महेंद्र मूनेश्वर,गौतम पाटील, शारदा झामरे,मनिष फुसाटे,मधुकर वानखेडे,प्रदीप लोखंडे, राजु मडावी,संजय पाटील, प्रकाश कांबळे, अभय कुंभारे,मधुकर ओरके,आशिष सोनटक्के,सुमेध बनसोड ईत्यादी संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे.
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा....
Comments
Post a Comment