समता सैनिक दलाची संरक्षण फळी संघर्षासाठी तयार*


 Vidarbh tiger news | wardha,

      *समता सैनिक दलाची संरक्षण फळी संघर्षासाठी तयार*


वर्धा: स्थानिक समता नगर येथील गट शिक्षण विस्तार अधिकारी रुपेश कांबळे यांच्या घरी संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पक्ष आणि संघटनांच्या ७० कार्यकर्त्यांनी समता सैनिक दल या सामाजिक संघटनेत जाहीर प्रवेश केला.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सुरक्षा विभाग प्रमुख प्रदीपभाऊ कांबळे, आँल इंडिया पँथर जिल्हाध्यक्ष पंकज भगत,भिम टायगर सेनेचे जिल्हा संघटक आशिषभाऊ जांभुळकर,सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मेश्राम हिगणघाट हे प्रामुख्याने उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय कुंभारे तसेच मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

     त्यानंतर अध्यक्ष तसेच उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.या दरम्यान सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला. त्यात प्रामुख्याने 

१. समाजात कुठेही अन्याय-अत्याचार झाल्यास सुरक्षा विभागाची चमू त्याठिकाणी तत्काळ जाऊन अन्याय दुर करण्याचा प्रयत्न करेल.


२.आंबेडकरी समाजाला गटा-गटात विभागणा-या विघातक प्रव्रुतीशी लढा देणे आणि वेळप्रसंगी त्यांना चोप देऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे.


३.समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, विषमतेचे समर्थन करणाऱ्या शत्रूशी मुकाबला करणे.


४.समाजातील विविध संस्था आणि संघटना यांना एका सुत्रात बांधण्याचा प्रयत्न करणे.

          असे विविध ठराव पारीत करून त्यावर तत्काळ कु्ती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.शेवटी सर्वांना आंबेडकरी समाजाचा निळा ध्वज खांद्यावर वाहून नेण्यासाठी प्रतिबद्ध असण्याची शपथ देण्यात आली.

     यावेळी अभय कुंभारे, प्रदीप कांबळे, अजय कांबळे,धम्मपाल तेलंग, शहारेभाऊ,धर्मपाल ढोबळे,आशिषभाऊ जांभुळकर,रोशनभाऊ कांबळे,अमोल ताकसांडे,पी.पटेल प्रशांत मेश्नाम,अमोल वन्जारी,पंकज भगत, दिपक हुके,राजकुमार मेश्राम,पवन थुल,चंदुभाऊ भगत, आशिष खवले, विशाल खोब्रागडे,विशाल उके,आकाश कांबळे, जितेंद्र बन्सोड, मोहसिम शेख, बंडू टेभुर्णे,देवानंद कोल्हेकर,वैभव चकोले,प्रफुल मेश्राम, विक्की वागदे,अनुप गोडघाटे,नरेंद्र शेळके,प्रकाश वाघमारे,फहिम काजी,सौरभ चचाणे ,महेश शेगोकर,सारांश दबडे,अमन सोनपीतळे, रजत दबडे,सम्यक नरांजे,अमन वाघमारे, विक्की वाघमारे, स्वप्निल ताकसांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





____________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.....


Comments