Vidarbh tiger news|wardha
*सेलू तालुका संघटकपदी अतुल कांबळे यांची नियुक्ती*
वर्धा: स्थानिक समता नगर येथील मार्शल अमोल ताकसांडे यांच्या घरी संपन्न झालेल्या सभेत मार्शल अतुल कांबळे यांनी सामाजिक,सांस्कृतिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची *समता सैनिक दल सेलू तालुका संघटकपदी* सर्वानुमते निवड
करण्यात आली.
त्यांना समता सैनिक दल *वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे* यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल या मात्रुसंघटनेचा निळा ध्वज अविरतपणे खांद्यावर वाहून नेण्यासाठी तसेच संघटनेला वाढवून पोलादी बनविण्यासाठी कटिबद्ध असण्याची शपथ घेतली.
सदर सभेला वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे,मार्शल अमोल ताकसांडे,मार्शल चंदू भगत,मार्शल रोशन कांबळे, मार्शल विक्की वागदे,मार्शल पप्पु पाटील,मार्शल प्रकाश वाघमारे,मार्शल पंकज भगत, मार्शल स्वप्नील ताकसांडे, मार्शल सीमा वाघमारे,मार्शल ज्योती ताकसांडे,मार्शल लक्ष्मी ताकसांडे,मार्शल अमोल वंजारी, मार्शल अरुण भोवते,मार्शल आकाश कांबळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा...
हे पण वाचा👇👇👇👇
Comments
Post a Comment