News blog | पद्दोंन्नतीत आरक्षण कायम ठेवण्यासाठी मागासवर्गीयांच्या ८० संगटनांचा आक्रोश मोर्चा धड़कला जिल्हा कचेरीवर
Vidarbh tiger news | blog| wardha
पद्दोंन्नतीत आरक्षण कायम ठेवण्यासाठी मागासवर्गीयांच्या ८० संगटनांचा आक्रोश मोर्चा धड़कला जिल्हा कचेरीवर*
वर्धा- समस्त अनुसूचित जाती- जमाती, भटक्या जाती,विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी आरक्षणाचे जनक राजश्री छ.शाहूजी महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजे २६ जुन ला वर्धा जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय संगठनांचा प्रचंड आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़कला...
मा.सर्वोच्च न्यायालयाने जो अंतिम निकाल येइल त्यास अधीन राहून मागासवर्गीयांचे ३३ % आरक्षण देण्याचे आदेश दिले असतांना व त्या आदेशानुसार केंद्र सरकारनेही परिपत्रक काढून निर्देश दिले असतांना सुद्धा महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीयांच्या तोंडचा घास काढून मागासवर्गीय कर्मचारी वरच्या पदावर जाउन त्यांना सन्मान मिळू नये म्हणून त्यांचे ३३% आरक्षणच बंद केले आहे. या विषयी अनेकदा निवेदन व विनंती करूनही सरकारने उचित तोडगा काढला नाही. त्या प्रकारामुळे समाजात राज्य सरकार बद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कोरोना/लॉकडाउन चे नियम पाळून मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा मागासवर्गीयांची दिनांक ७/०५/२०२१ च्या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेले 33 टक्के आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या १७/०५/२०१८, ०५/०६/२०१८ व केंद्र सरकारच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या आदेशाप्रमाणे मा.न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी,
मंत्रालयातील अधिनस्त अधिकाऱ्यांनी षढयंत्र करून मागासवर्गीयांची पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्यांवर ॲट्रॉसिटी तसेच आरक्षण अधिनियम कलम 8 अन्वये गुन्हे दाखल करावे, मंत्रीगट समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या अमागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब निष्कासित करून मागासवर्गीय मंत्री यांची नियुक्ती करावी. या व इतर १६ मागण्यासाठी काढन्यात आला असल्याचे आरक्षण हक्क कृति समितिने सांगितले
.
या आक्रोश मोर्चात स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई), महाराष्ट्र ऑफिसर फोरम, ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, प्रजासत्ताक शिक्षक संसद , प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, राष्ट्रीय मजदूर सेना व संबुद्ध महिला संघटना, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ , स्वतंत्र औद्योगिक कामगार संघटना, भीम आर्मी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , गवंडी बांधकाम मजदूर युनियन, विदर्भ भोई सेवा संघ, बहुजन समाज पार्टी, मागासवर्गीय कृषी अधिकारी कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र लोक कामगार संघटना सहभागी होत्या.सदर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महेंद्र मुनेश्वर होते तर मोहन राईकवार, मनिष फुसाटे, जि.प.सभापती सरस्वती मडावी, चंद्रशेखर मडावी, अशोक धुर्वे, राजेंद्र कळसाईत, मनिष ठाकरे, मधुकर वानखेडे, सुनिल तेलतुंबडे यांनी वीचार व्यक्त केले.
संचालन गौतम पाटील, प्रास्तविक धर्मपाल ताकसांडे तर आभार अजय जवादे यांनी मानले.
त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकरी यांना मोर्चाचे निवेदन दिले.या शिष्टमंडळात धर्मपाल ताकसांडे, अनिल खडसे, गजाजन थुल, ज्ञानेश्वर खैरे, डॉ.गजानन सयाम,अभय कुंभारे, शारदा झामरे, प्रशांत रामटेके, प्रकाश काम्बले, रमेश निमसरकार, गौतम पाटिल, अजय जावादे, महेंद्र मुनेश्वर, आणि आशीष सोनटक्के यांचा सहभाग होता.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
हे पण वाचा 👇👇👇👇👇 क्लिक करा आणि वाचा
Corona ची तिसरी लाट | डेल्टा प्लस
Comments
Post a Comment