Vidarbh tiger news| तथागत गौतम बुद्ध,
जाणून घ्या पंचशील मार्गाचा अर्थ |पाहा सविस्तर पुढीलप्रमाणे:-
पंचशील
1)मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
2)मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
3)मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
4)मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
5)मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
आनंदी,परिपूर्ण व आदर्श जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटही जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे..
१.प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणविणे. कायेने वा वाचेने. अगदी मनाविरुद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे.
२.चोरी न करणे एखाद्याच्या मालकीची वस्तु त्याने दिल्याशिवाय घेणे, बळकावणे, डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर रहाणे ही गरज आहे.
३.चारित्र्य-शीलाची जपणूक करणे निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे..शीलवंतांना मान-सन्मान असतो, एवढेच नव्हे तर त्यांचेच समाजात नैतिक वजन असते..सत्शील वर्तनाने मोल प्राप्त होते.
४.खोटे न बोलणे खरे बोलणे. खरे सत्य शोधणे. सत्याधारित वागणे इ बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्य-वचनाचे मोल अबाधित आहे. खरे बोलतानाही ठेंगण्याला 'तू ठेंगणा आहेस.' वा 'तू काळा वा काटकुळा आहेस.' असे बोलून वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे एक कसब आहे.
५.मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे.. उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक ठरेल.
ही आहेत सम्यक संबुद्धांनी दिलेली पाच शिले पंचशील.[२७]
या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे.
Jay bhim | namo buddhay 💙....
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Comments
Post a Comment