Vidarbh tiger news|father day special|poem|कवी:- गणेश रामदास निकम सर


 Vidarbh tiger news|Father day special|poem

  कविता: बाबा 


बाबा,तुम्ही आयुष्यभर

आमच्यासाठी राब राब राबतात

दुःख स्वतःचे मात्र नेहमीच

मनात तुमच्या दाबतात.


दिसू देत अश्रू कधीच

अश्रू लपवण्याची तुमची कला

असा हा त्यागमय बाबा

हवा हवा वाटतो नेहमी मला


बाबा, माझ्या शिक्षणासाठी

एक एक जमवतात तुम्ही पाई

बाबा, तुमच्यामध्येच दिसते

मला मित्र भाऊ आणि आई


बाबा, सर्वच नात्यांचा तुम्ही

तुम्ही एकमेव असा धागा

कुणीच घेऊ शकत नाही

बाबा, तुमची जागा


बाबा, तुम्ही ओरडतात रागावतात

आमचं काही चुकल्यावर

पण बाबा प्रिय का वाटत नाही

वयोवृद्ध होऊन थकल्यावर


बाबा,म्हातारपणी तुम्ही

का बनू शकत नाही आमचे बाळ

आम्हीही तुमचं तोंड पुसावे

जरी गळत असेल तुमची लाळ


*कवी: गणेश रामदास निकम सर*


*फादर्स डे निमित्ताने सर्व पालक वर्गास कविता समर्पित*

_____________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.....

Comments