Vidarbh tiger news | wardha.
*पेट्रोल, डिझेल,गँस सिलेंडर व वाढत्या महागाई विरोधात समता सैनिक दलाचे बैलबंडी आंदोलन*-
*जिल्हाधिका-यांना दिले निवेदन*
वर्धा:पेट्रोल,डिझेल व गँस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात समता सैनिक दलच्या वतीने बैलबंडी आंदोलन करण्यात येऊन मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान भारत व मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन पाठविण्यात आले.
एकीकडे कोरोना संक्रमण काळात लाँकडाऊनमुळे लोकांचे रोजगार संपले असून हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गँसचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल यांच्या दरवाढीमुळे जिवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत.गँस सिलेंडरचे सुद्धा भाव वाढल्यामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे.दररोज होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे.कोरोनाच्या संकटात सर्व कामे धंदे ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोक-या सुद्धा गेलेल्या आहेत. या सर्व समस्या लक्षात घेता सर्वसामान्यांना दिलासा मिळणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.तसेच संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात लागू आहेत. या दरवाढीमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांची सर्रास लुट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.केंद्र व महाराष्ट्र शासनाने पेट्रोल,डिझेल व गँस सिलेंडरवर केलेली दरवाढ तात्काळ कमी करावी व सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी आपणास समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटच्या वतीने *बैलबंडी आंदोलन* करून या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे.
या आंदोलनात समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत,मार्शल अजय कांबळे,मार्शल अमोल ताकसांडे, मार्शल रजत दबडे,मार्शल सारांश दबडे,मार्शल अमन सोनपितळे, मार्शल धिरज भगत, मार्शल विशाल वैद्य,मार्शल नयन दखणे, मार्शल राजू शेजोळकर, मार्शल दीपक हूके,मार्शल शितल हूके,मार्शल चंदु भगत,मार्शल पप्पु पाटील, मार्शल पवन थुल, मार्शल अंकुश मुंजेवार,मार्शल पंकज भगत, मार्शल अमोल वंजारी, मार्शल आकाश कांबळे, मार्शल लोकेश मडावी, मार्शल आशिष लोखंडे, मार्शल दिपक गेडाम, मार्शल स्मिता नगराळे, मार्शल सोनम वंजारी, मार्शल रिंकू घोडेस्वार, मार्शल बब्लु राऊत, मार्शल आनंदराव फुसाटे, मार्शल विश्वसराव भुरे,मार्शल लक्ष्मण पेटकर, मार्शल पांडूरंग बावणे, मार्शल विजय हटवार,विलास प्रधान, मार्शल गजानन भुरे,मार्शल स्वप्नील भुरे,मार्शल वासुदेव डोहाळे,आदीकार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. .
_____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561780423 या क्रमांकावर संपर्क करा..
आणि subscribe vidarbh tiger news channel la.
______________________________________________
Comments
Post a Comment