मनामध्ये येणारे विचार आणि वाईट दृष्टीकोन


 Vidarbh tiger news|blog

 नमस्कार मित्रहो,तुमच्या समोर घेऊन आलो आहे एक नवीन लेख त्याच नाव  (मनामध्ये येणारे विचार आणि वाईट दृष्टीकोन ) हे आहे.

आज या विज्ञानयुगात आपण वावरत आहे त्यात सगळे जन आपल्याला कामात व्यस्त आहे  

या युगात काही चांगले आणि काही वाईट लोक पण आहे.

व त्यात सगळ्यांचे विचार व दृष्टीकोन वेग वेगळे आहे...

>त्यात विशेष म्हणजे वाईट दृष्टिकोन जास्त प्रमाणात आहे.

कारण शक (संशय) घेण्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे.

आज काल सगळ्या जवळ मोबाईल आहे तो पण Android smartphone.

कोणीही मोबाईल मध्ये जास्त कॉल वर बोलत जर राहिला तर काहिंजन संशय घेतात की मुलगा बिघडला तो पहिल्यासारखा राहिलेला नाही.

त्याचे आता भाव वाढले आहे तो आता आपल्या संग बोलणार नाही .

आता मित्रांसग बोलायला वेळ नाही .विसरला तो आपल्याला आता तो बोलणार नाही.

असे  वाईट विचार येतात,पण सत्य तर कोणीही मित्रांना विसरत नाही ,

कोणीही मोबाईल मध्ये व्यस्त राहत असेल त त्याचा मागचं कारण वेगळं पण राहू शकते ..

कोणाचा व्यवसाय पण राहू शकते मोबाईल वर,म्हणून काहीजण  व्यस्त राहतात .

माझ्या संग घडलेली एक घटना :-

कालचीच गोष्ट आहे ,मी बकऱ्या आणायला गेलो होतो 

बकऱ्या यायला खूप वेळ होता,मग मी एका खाली घराजवळ बसलो होतो,

काही चार पाच जण एका बिल्डिंग वर बसले होते,

ते माझ्या कडे खूप पाहत होते ,त्यांना वाटले की याच काही आहे वाटते .

त्यातून एक जण म्हणाला तो कोणता मुलगा त्या घराजवळ बसला आहे...ते मला शक च्या नजरेने पाहत होते,

त्यांना वाटते की हा तिथे काय करत आहे .बहुतेक काही तरी आहे ..

असे वाईट दृष्टीकोन वाले पण जगात आहे . व त्यांच्या मनात अनेक प्रकारचे विचार उत्पन्न होत होते.

आणखी एक वाईट दृष्टीकोन :- मुली कडे काही जन खूप वाईट नजरेने पाहत असते,अश्या वेळी बाहेर निघायला मुली खूप घाबरतात .

बंद करा मुलींना वाईट नजरेने बघणे.तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे .

असे भरपूर प्रकारचे विचार आणि वाईट दृष्टीकोन आहे ...

हे सगळं आपल्यावर आहे.जस विचार करणार तस आपण बनू...म्हणून चांगले विचार करा.आणि चांगलं दृष्टीकोन ठेवण्याच्या प्रयत्न करा....

येवडे बोलून माझे ब्लॉग समाप्त करतो..

                                        Blogger :-Avinash bhagat..

______________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा...

______________________________________________


Comments