समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे व तालुका संघटक मनोज थुल यांनी रक्तदान करून रुग्णाला दिले जिवनदान*


 * सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे व तालुका संघटक मनोज थुल यांनी रक्तदान करून रुग्णाला दिले जिवनदान*

 वर्धा: समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक अभय कुंभारे व तालुका संघटक मनोज थुल यांनी कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील गरजू रुग्णाला रक्तदान करून जीवनदान दिले.

      

     एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतांना दुसरीकडे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील रक्तपेढीत आवश्यक तेवढा रक्तसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना रक्त मिळणे अवघड झाले आहे.

     अशा परिस्थितीत समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपभाऊ कांबळे यांना कुंदन मडावी यांचा फोन आला.त्यानी सांगितले की,कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे भरती असलेल्या माधुरी पंकज ढामसे, वय-२८ वर्षे, राहणार तरोडा या डेंग्यू झालेल्या ८ महिन्याच्या गरोदर महिलेस रक्ताची नितांत गरज आहे. प्रदीप कांबळे यांनी जिल्हा संघटक अभय कुंभारे व तालुका संघटक मनोज थुल यांना लगेच संपर्क साधला असता त्यांनी थेट रुग्णालय गाठून गरजू रुग्णाला तातडीने रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचविला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी कल्याणाचे कार्य आहे. या उदात्त भावनेतून अभय कुंभारे यांनी आतापर्यंत ३१ वेळा रक्तदान केले आहे.

     रक्तदान केल्याबद्दल डॉक्टर तसेच रुग्णाच्या कुटुंबीयांनी अभय कुंभारे व मनोज थुल यांचे मनपूर्वक आभार मानले.रक्तदान केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे,मार्शल दिपक हूके, कुंदन मडावी, पंकज ढामसे उपस्थित होते.

______________________________________________

Comments