𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜| 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊.
*भुखंड वाटप न केल्यास सिंदी(मेघे)येथील महिलांचा सामुहिक आत्मदहनाचा ईशारा*
वर्धा:सिंदी(मेघे) ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार नागरिकांना १५८ आबादी करीता राखीव असलेल्या जागेवर भुखंड पाडून वाटपाची कार्यवाही ताबडतोब करावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन समता सैनिक दल सिंदी(मेघे) शाखेच्या वतीने मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मा.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यामार्फत देण्यात आले.सदर निवेदन समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, जयबुदध लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
आम्ही मौजा सिंदी(मेघे)त.जि.वर्धा सर्वे क्रमांक १५८ येथे राहणारे रहिवाशी असून गरीब कुंटुंबातील रोजमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कशीतरी उपजिविका चालवित आहोत.
यातील बरेचसे बांधव हे दिव्यांग,निराधार,व्रुध्द शिवाय शेतमजुरी करून पोट भरतात तसेच आमची आर्थिक परिस्थिती प्लॉट विकत घेऊन घर बांधून राहण्याची नसल्यामुळे मौजा सिंदी(मेघे)ता. जि.वर्धा येथील सर्वे क्रमांक १५८ या सरकारी जागेवर अतिक्रमण करून तट्टयाबो-याचे झोपडे बांधून कुटुंबासह राहत आहोत.
सदर जागा मिळण्याकरिता आम्ही वेळोवेळी शासनासोबत पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. तसेच ग्रामपंचायत सिंदी(मेघे) यांनी नागरिकांना घर बांधण्यासाठी भुखंड मिळण्याबाबत' दिलेल्या अर्जाची दखल घेत दिनांक २३/०८/२०१७ रोजी ठराव मंजूर करून सर्वे क्रमांक १५८ मध्ये भुखंड मिळण्यासाठी ठराव मंजूर केलेला आहे. सदर ठरावाची प्रत आम्ही शासनाला देखील दिलेली आहे.
आमच्या विनंती अर्जावर मा.तहसीलदार साहेब वर्धा यांनी नगर रचनाकार वर्धा यांना वेळोवेळी प्लॉट पाडण्याबाबत लेखी पत्राद्वारे पत्रव्यवहार देखील केलेला आहे व सदर प्रकरण तहसीलदार साहेब वर्धा व नगर रचनाकार वर्धा यांच्या कार्यालयात निकाली काढण्याकरिता व न्याय मिळण्याकरिता प्रलंबित आहे.
अशा परिस्थितीत आम्हा रहिवाशांना राहण्याकरिता दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आमची परिस्थिती सळो- की-पळो अशी झालेली आहे.
लाँकडाऊनच्या काळात आमच्यावर अगोदरच उपासमारीची वेळ आलेली आहे अशा बिकट परिस्थितीत जर जबरदस्तीने आमच्या झोपड्या हटविल्या तर ज्या ठिकाणी आम्ही
झोपड्या बांधून राहात आहोत त्याच ठिकाणी आम्हाला सामुहिक आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. अश्या परिस्थितीमध्ये आपण या प्रलंबित प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन संखोल चौकशी करून संबंधित प्रकरणावर कार्यवाही करावी अशी आपणास मागणी करण्यात येत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतांना पप्पु पाटील, रोशन कांबळे, चंदु भगत,अमोल वंजारी, अश्विनी गजभिये, रमा गजभिये, सीमा रामटेके, मुन्नी मेश्राम, उषा मरसकोल्हे,सुषमा मरापे,प्रतीभा मून,मीना रामटेके, विद्या कोवे,दिपाली ईंगोले,चंद्रकला पखाले,लिला शिरसाम,सुमन फुलझेले, वंदना वासनिक, वंदना फुलझेले, प्रिती शिंगणापूरे,दिपा घाटे,रत्नमाला रामटेके, निर्मला शेंदरे,जया उईके, अनुसया राऊत,वनिता नरड,कल्पना मठ्ठे,नलु ईरपाते,उषा धुर्वे,साधना चव्हान,सोनाबाई दुधभेळे,आशा बगळे,विमल जांभुळकर,माधुरी ढाले,शोभाबाई मडावी,कांता पाठक,सावण गरगिरे,संध्या गजभिये,अंजु भेडांरे,गंगाबाई गजघारे,आकाश खापरडे,माधुरी खडसे,विमला फुगे,भारती सरकटे,शेवंताबाई इंगोले,अर्चना वाटगुळे,बेबी महाडोळे,मंदा मरापे,रंजना शेळके आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
______________________________________________
Comments
Post a Comment