𝙑𝙞𝙙𝙖𝙧𝙗𝙝 𝙩𝙞𝙜𝙚𝙧 𝙣𝙚𝙬𝙨,
""""माणसे जोडली आपण.....?????"""
वाटले कि चार माणसे जोडली आपण
फक्त चार नाही..........?
फार माणसे जोडली आपण.
आपल्या नात्यास नव्हती,
चव जरा-सुद्धा.......?
त्यामुळे चवदार माणसे जोडली आपण.
विश्व म्हणजे फक्त होता
आलेला मनात विचार...?
त्या मनात सुद्धा चार माणसे जोडली आपण.
विचार बदलणार नाही
आपले आता......?
वाढला विनिमय... माणसे जोडली आपण.
तुटलेल्या मनाच्या समजूतीसाठी
समजदार........?
माणसे जोडली आपण.
कौतुकाचा भार पडला आपल्या माथी
मानले आभार......?
माणसे जोडली आपण.
शक्य नव्हते एखाद्या मनाला सोडणे तेव्हा
मग घेतली माघार.......?
माणसे जोडली आपण.
बंद झाली देखत आपल्या पुन्हा,
मनाची दारे.....
बुजत गेल्या खिडक्या......?
माणसे जोडली आपण.
कोणीच कोणाच्या मनात जाऊन,
पाहिले नाही.......
फक्त हाहाकार झाला......?
माणसे जोडली आपण.
संकेत सुनीता कैलास वाघमारे
जहागीरपुर (अमरावती)
9665289515
_____________________________________________
𝙉𝙚𝙬𝙨 𝙥𝙪𝙗𝙡𝙞𝙨𝙝 करण्यासाठी संपर्क साधा 9561750423 या नंबरवर।
Comments
Post a Comment