Vidarbh tiger news |poem,
*निळाई*
मी लहानपणी बघायचो
आमच्या वस्तीतील
निळ्या पांढऱ्या रंगाने रंगलेले प्रत्येक घर
मी लहानपणी बघायचो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी निळ्या तोरणांनी सजलेली नगरे
मी लहानपणी बघायचो
निवडणुकीच्या काळातही
कार्यकर्त्याच्या हाती असलेले निळे झेंडे त्यांनी पांघरलेले निळे दुप्पटे
मी लहानपणी बघायचो
आमच्या आई-बापाच्या डोळ्यात
रिपब्लिकन भारताचे ते निळे स्वप्न.
मी लहानपणी बघायचो
आमच्या वस्तीतील छोट्याशा बाळाच्या नामकरणातही दिनबंधु,सूर्यकांत, वामनदादांची,गायले जात निळाईचे गाणे
मी लहानपणी बघायचो
दर पौर्णिमेला पांढऱ्या शुभ्र वस्त्रात धम्मध्वजाला वंदन करत
निळ्या झेंड्याखाली एकतेचा संदेश घेऊन जाणारी निळी माणसे
मी लहानपणी बघायचो
उपाशी-तापाशी चळवळीशी निष्ठा
राखणारी निळी टोपी घातलेली माणसे
बांधून कांदा भाकरीची शिदोरी
समता सैनिक दलात सामील होऊन संघर्षासाठी लढणारी माणसे
...........मला आजही वर्तमानात
तेच बघायच
बा! भीमाच्या चळवळीचे घेऊनी सूत्रे
'निळाई' साठी जगणारी निळी माणसे....
*सुरेश किसनराव भिवगडे*
*रा.आंबेडकर नगर, आर्वी ता.आर्वी जिल्हा-वर्धा*
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी संपर्क करा ....(९५६१७५०४२३)
Comments
Post a Comment