पेट्रोल पंप हटाव कृती समिती, वर्धा.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन सभा


 𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜| 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊

पेट्रोल पंप हटाव कृती समिती, वर्धा.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन सभा:-

स्थळ: डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिविल लाइन, वर्धा.

गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर, 2021,

वेळ:- सकाळी 8 ते रात्री 10 वा. पर्यंत.

प्रमुख अतिथींचे मुख्य मार्गदर्शन:- सायंकाळी पाच वाजता.

" माझ्या लेकरांनो ही शेवटची लढाई आहे, आता तरी एकत्र या, मी तर  एकटाच लढलो तुम्ही असंख्य आहात वेळ फार कमी आणि संघर्ष खूप मोठा आहे.

- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

                     || जाहीर आवाहन||

सप्रेम जय भीम, 

समस्त नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की, वर्धा शहराचा केंद्रबिंदू असलेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जनसामान्यांसाठी प्रेरणास्थान आहे .महाराष्ट्र व केंद्र सरकार जाणीवपूर्वक धर्मांध वादि राजकीय पुढाऱ्यांच्या आदेशावरून ,परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सूड बुद्धीचे कट-कारस्थान करीत आहे .अगदी , पुतळ्याला लागून  पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंप ची निर्मिती करून या पुतळा परिसराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे.

संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सभोवताल सौंदर्यीकरण करण्यात आले असतांना शासनाच्यावतीने अती ज्वलनशील पदार्थ पेट्रोल पंप या ठिकाणी होऊ नये या लोक भावनेतून जिल्ह्यातील बहुजन जनता सातत्याने गेल्या तीन महिन्यांपासून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात दिनांक 10 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी भव्य मोर्चा, दिनांक 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील वर्धा, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, पुलगाव, आर्वी, आष्टी, कारंजा या तालुकास्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर दिनांक 17 सप्टेंबर रोजी हिंगणघाट शहरात जन आक्रोश मोर्चा, दिनांक 24 सप्टेंबर रोजी पुलगाव येथे जन आक्रोश मोर्चा तसेच वर्धा येथे दिनांक 16 सप्टेंबर पासून आंबेडकरी व पुरोगामी संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सातत्याने दररोज सुरू आहे.

    वर्धा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर स्थळी प्रबोधनात्मक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व, धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, सामाजिक न्याय दिन, महापरिनिर्वाण दिन, भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असे महत्वपूर्ण कार्यक्रम या परिसर स्थळी आयोजित केले जातात. या विविध कार्यक्रमांना हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. संविधान निर्माते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. वर्धा शहरातील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा समस्त जनतेची अस्मिता आहे. अशा ऊर्जावान अभिवादन स्थळी पोलीस प्रशासनाचा होऊ घातलेला पेट्रोल पंप दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण वर्धा जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलने सुरू आहे, तरी येथील शासन प्रशासनाने अजून पर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही.

   करिता दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी, आपले प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन अधिक तीव्रतेने गतीमान करण्यासाठी समस्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सम्मिलित होऊन आंबेडकरी एकजुटीची शक्ती दाखवून द्यावी, असे वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येत आहे.

                                                             धन्यवाद! 

___________________________________________

या लेख ला जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय... 

                             ||विनीत||

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, भिम टायगर सेना, भीम आर्मी, निर्माण सोशल फोरम, संबुद्ध महिला संघटना, संभाजी ब्रिगेड, समता सैनिक दल, झलकारी सेना, बिरसा क्रांती दल, बहुजन युथ पॅंथर.

Comments