पेट्रोल पंप हटाव कृती समिती वर्धाच्या वतीने समता सैनिक दलाचे कार्यकर्त्यांनी सरकार, जिल्हा प्रशासन,पालकमंत्री व खासदार, आमदार यांचा केला तीव्र निषेध*
𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜| 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊
*साखळी उपोषणाचा 40 वा दिवस*
*पेट्रोल पंप हटाव कृती समिती वर्धाच्या वतीने समता सैनिक दलाचे कार्यकर्त्यांनी सरकार, जिल्हा प्रशासन,पालकमंत्री व खासदार, आमदार यांचा केला तीव्र निषेध*
*वर्धा : दिनांक 25 ऑक्टोबर (सोमवार)*
*वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे साखळी उपोषणाचा आजचा 40 वा दिवस आहे.साखळी उपोषणातुन कृती समितीच्या समता सैनिक दल आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सरकार, जिल्हाधिकारी - पोलिस प्रशासन तसेच खासदार, आमदार व पालकमंत्री यांचा तीव्र निषेध केला आहे*
आज सकाळी 11.00 वाजता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ सिव्हिल लाईन,वर्धा येथे समता सैनिक दलाचे सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे,तालुका संघटक मनोज थुल,राकेश डंभारे,पप्पू पाटील, अमोल ताकसंडे,अनिल लोखंडे,बालू धपके,विकी वागदे,दीपक हुके,प्रविण नावाडे आदीं उपोषणाला बसले होते.जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने सरकार-शासन व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात दररोज साखळी उपोषण सुरु आहे.
संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळून पोलिस वेल्फेअरच्या पेट्रोल पंपची जागा स्थलांतरित करण्यात यावी हि प्रमुख मागणी आहे.
जो पर्यंत पेट्रोल पंप ची जागा स्थलांतरित होत नाही तो पर्यंत राज्य सरकार , केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन सुरु राहिल असे समता सैनिक दलाचे सुरक्षा दल प्रमुख प्रदीप कांबळे म्हणाले.
भारतीय संविधान जिंदाबाद,पोलिस प्रशासन वेल्फेअरचा पेट्रोल पंप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळुन हटलाच पाहिजे अशा घोषणा देऊन जिल्हाधिकारी-पोलिस प्रशासन,महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार,पालकमंत्री नामदार सुनिल केदार,आमदार रणजित कांबळे यांचा सर्व सहभागी आंबेडकरी व पुरोगामी संघटना कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.
Comments
Post a Comment