समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिट तर्फे मार्शल अँड.विमलसूर्य चिमणकर सर यांना आदरांजली*


 𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜 | 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊, 

*समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिट तर्फे मार्शल अँड.विमलसूर्य चिमणकर सर यांना आदरांजली*

 वर्धा: वर्तमानातील या संक्रमण काळात अँड.विमलसूर्य चिमणकर सरांच्या प्रखर विचारांची आवश्यकता आहे. त्यांनी आंदोलनाला पुढे नेताना कुठेही तडजोड किंवा गद्दारी केली नाही. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना योग्य दिशा दाखवून आंदोलनाला गती देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी असीम त्याग,परिश्रम व समर्पणनातून समता सैनिक दलाचा निळा कारवा इथपर्यंत आणला आहे.हा निळा कारवा कार्यकर्त्यांनी येथून पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असे प्रतिपादन समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे यांनी केले.

       ते समता नगर येथे समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटच्या वतीने आयोजित आंबेडकरी तत्वज्ञानाचे भाष्यकार व समता सैनिक दलाचे मुख्य मार्गदर्शक स्मृतीशेष अँड.वीमलसूर्य चिमणकर सर यांचा स्मृतीदिन 'समर्पण दिन' म्हणून पार पडलेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

      या आदरांजली सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्शल अजय कांबळे,जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, मार्शल संघर्ष डहाके, हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

     जिल्हा संघटक अभय कुंभारे पुढे म्हणाले की,मार्शल अँड.वीमलसूर्य चिमणकर सर यांनी स्वतःला सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनात समर्पित करीत भारतीय समाजात परिवर्तन व्हावे, आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, आंबेडकरी समाज स्वाभिमानाने खंबीरपणे उभा रहावा यासाठी निष्ठावान कर्मयोगीप्रमाणे जीवनभर लढत राहिले.

    त्यांनी कार्यकर्ते मार्शल्स मध्ये जिद्द, उत्साह व आत्मबल निर्माण केले.त्यांच्या त्यागपूर्ण व्यक्तीत्व व संघर्षशिल कर्तृत्वामुळेच आज आंबेडकरी आंदोलन समता सैनिक दलाच्या रुपात जिवंत आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक अजय कांबळे यांनी सुद्धा सभेला संबोधित केले.

     यावेळी आदरांजली सभेला मार्शल अमोल ताकसांडे, रजत दबडे,नयन दखणे,रणजित भगत,चंदु भगत, दिपक हुके,रोशन कांबळे, पप्पु पाटील, प्रकाश वाघमारे, सीमा वाघमारे, प्रज्वल वाघमारे, नैतिक वाघमारे,नितीन पाटील, चंदू अंबोरे,सम्यक ताकसांडे, ज्योती ताकसांडे, विनोद कांबळे, स्वप्नील ताकसांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments