सिंदी (मेघे) येथील झोपडपट्टया हटवू नये-आँल इंडिया पँथर सेनेची मागणी*


 𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜| 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊. 

*सिंदी (मेघे) येथील झोपडपट्टया हटवू नये-आँल इंडिया पँथर सेनेची मागणी*

*-तहसीलदार यांना दिले निवेदन*


       वर्धा: 28/8/2017 रोजी सिंदी(मेघे) ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार नागरिकांना १५८ आबादी जागेकरीता राखीव असलेल्या जागेवर भुखंड पाडून वाटपाची कार्यवाही ताबडतोब करावी व त्यांच्या झोपड्या हटविण्यात येऊ नये अशा आशयाच्या मागणीचे निवेदन आँल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मा.तहसीलदार वर्धा यांना देण्यात आले.

        मौजा सिंदी(मेघे)त.जि.वर्धा सर्वे क्रमांक १५८ येथे राहणारे रहिवाशी असून गरीब कुंटुंबातील रोजमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कशीतरी उपजिविका चालवित आहेत.

यातील बरेचसे बांधव हे दिव्यांग,निराधार,व्रुध्द शिवाय शेतमजुरी करून पोट भरतात तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती प्लॉट विकत घेऊन घर बांधून राहण्याची नसल्यामुळे मौजा सिंदी(मेघे)ता. जि.वर्धा येथील सर्वे क्रमांक १५८ या सरकारी जागेवर अतिक्रमण करून तट्टयाबो-याचे झोपडे बांधून कुटुंबासह राहत आहेत.

     अशा परिस्थितीत त्यांनी बांधलेल्या झोपड्या हटविल्यास त्यांच्याकडे राहण्याकरिता दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

       लाँकडाऊनच्या काळात त्यांच्यावर अगोदरच उपासमारीची वेळ आलेली आहे अशा बिकट परिस्थितीत जर जबरदस्तीने त्यांच्या झोपड्या हटविल्या तर त्यांचासमोर राहण्याचा बिकट प्रश्न निर्माण होईल तरी सरकारने त्यांचे अतिक्रमण हटवू नये व त्यांना ताबडतोब भुखंड वाटप करण्यात यावा. अन्यथा आँल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

         निवेदन देतांना आँल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष पंकज भगत,युवा उपाध्यक्ष अमोल वंजारी,वंदना वासनिक, चंदा पखाले, रत्नमाला रामटेके आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments