झोपडपट्टी हटविण्याच्या आदेशाला स्थगिती;अखेर समता सैनिक दलाचे आंदोलन झाले यशस्वी*


 𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜 | 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊, 

*झोपडपट्टी हटविण्याच्या आदेशाला स्थगिती;अखेर समता सैनिक दलाचे आंदोलन झाले यशस्वी*

वर्धा:अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध सदैव पेटून उठणारी, अन्यायाला वाचा फोडणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

स्थापन केलेली एकमात्र पोलादी मात्रुसंघटना समता सैनिक दल वर्धाच्या कार्यकर्त्यांनी गरीब, वंचित,पिडीत, दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना मिळवून दिला न्याय. त्यामुळे त्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे.

    सविस्तर व्रुत्त असे की, सिंदी मेघे ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक १५८/१ मधील रिक्त असलेल्या जागेवर मागील अनेक वर्षांपासून बरेचसे दिव्यांग,निराधार, व्रुध्द व शेतमजूर त्यांची आर्थिक परिस्थिती प्लाँट विकत घेऊन राहण्याची नसल्याने तट्टया बो-याची झोपडी बांधून राहत होते. ती रिक्त जागा मिळण्यासाठी तेथील वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून शासनाला मागणी केली. परंतु शासनाने त्यांना जागा न देता सिंदी(मेघे) ग्रामपंचायतने दिनांक८/११/२०२१रोजी त्या गरीबांना ७ दिवसाच्या आत झोपड्या हटविण्याचा नोटीस दिला आणि अशातच दिनांक १८/११/२०२१ रोजी मा.तहसीलदारांनी झोपडपट्टी हटविण्याचे आदेश दिले.हा अन्याय सहन न झाल्याने तेथील काही रहिवाशांनी समता सैनिक दलाचे वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकरणाची पुर्ण माहिती देऊन आपबिती सांगितली. त्यानंतर त्यांनी समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्याशी बातचीत करून प्रश्न मार्गी लावण्याकरिता आपल्या संघर्षाला सुरुवात केली. त्यामुळे अभय कुंभारे व प्रदीप कांबळे यांनी त्या गरीब रहिवाशांना कोणताही खर्च किंवा मोबदला न मागता स्वतःच्या खर्चाने निवेदन देणे ,त्यांना संबंधित कार्यालयात घेऊन जाणें, एवढ्यावरच न थांबता त्यांना नाश्ता, चहा देणे सुद्धा स्वतःच्या खर्चाने केले.तेथील गरीब रहिवाशांना राहण्याकरिता दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांची सळो-की-पळो अशी विदारक परिस्थिती झाली होती. शेवटी दि.१७/११/२०२१ रोजी अभय कुंभारे व प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोरच न थांबता व पोलिसांना न जुमानता चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले. जोपर्यंत आम्हाला पट्टे मिळणार नाही आणि तहसीलदाराने काढलेला आदेश रद्द होत नाही .तोपर्यंत आम्ही कार्यालयातून जाणार नाही. असे ठणकावून सांगत आदोलनकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. त्या अनोख्या आंदोलनाची माहिती वा-यासारखी  पसरु लागल्याने तेथीलच अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारीसुद्धा पाहण्यासाठी गर्दी करु लागले.गर्दी होत असल्याने पोलीसांची सुद्धा दमछाक होत होती.काही वेळाने तेथील आंदोलनकर्त्यांनी आलेल्या मा.तहसीलदाराने आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला. परंतु आदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याचे पाहून ठिक आहे तुमच्या मागण्यांची पुर्तता करण्यात येईल. सद्यस्थितीत तुम्ही त्या जागेवर राहु शकता.तेथून तुमच्या झोपड्या कोणीही हटविणार नाहीत.आदेशाला दोन महिन्याची स्थगिती देण्यात येत आहे. तोपर्यंत प्रशासन तुमच्यासाठी दुसरीकडे जागा पहाणार. जागा न मिळाल्यास किंवा जागा राहाण्यायोग्य नसल्यास तुम्ही त्याच जागेवर स्थाईक राहणार ,असे मा.तहसीलदाराने आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. तेव्हा कुठे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करीत आंदोलन मागे घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच वर्धेचे सामाजिक कार्यकर्ता विल्सन मोखाडे यांनी आंदोलनात जात जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला आणि अभय कुंभारे व प्रदीप कांबळे यांनी अथक परिश्रमातून न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ज्या-ज्या वेळी प्रशासनाच्या माध्यमातून गरीबांवर अन्याय-अत्याचार होईल त्या-त्यावेळी  आम्ही कोणतीही तमा न बाळगता रस्त्यावर उतरू असे प्रदीप कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.यवेळी जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल,पप्पू पाटील, चंदु भगत व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे या आंदोलनात महीलांची संख्या जास्त होती.

Comments