*तरोडा येथे समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत


 Vidarbh tiger news | arvi wardha| samata sainik dal wardha, 

  *तरोडा येथे समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत*


आर्वी:समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची शाखा स्थापन करण्यासंदर्भात रमाबाई पंचकमेटी,तरोडा तालुका-आर्वी येथे सभा संपन्न झाली. यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सुरक्षा प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे,आर्वी तालुका संघटक प्रफुल काळपांडे, मार्शल अमोल दाभने, मार्शल शैलेश कांबळे, समाजिक कार्यकर्ता प्रदीप गवळी, मार्शल पप्पू पाटील,मार्शल चंदु भगत प्रामुख्याने उपस्थित होते.

        यावेळी जिल्हा संघटक अभय कुंभारे  यांच्या मार्गदर्शनात ग्राम शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात शाखा संघटकपदी गजानन येसनकार,सह-संघटक म्हणून राहुल करमकार,निमंत्रक-बलराम रामटेके, प्रचारक-प्रदीप दिपके,कोषप्रमुख अविनाश कोल्हे यांची निवड करण्यात आली. जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

      सदर सभेला संबोधित करतांना अभय कुंभारे यांनी तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल या मात्रुसंघटनेत मोठ्या प्रमाणात सामिल होऊन संघटनेला मजबूत करण्याचे आवाहन केले.

   यावेळी सदस्य म्हणून तेजस कोल्हे,शरद येसनकार,शुभम थुल, संतोष येसनकार,भाऊराव येसनकार, प्रभाकर रामटेके, ओमप्रकाश थुल, महादेव येसनकार, नामदेव येसनकार, लहानुजी करमकार, ज्ञानेश्वर कोल्हे,सहादेव येसनकार, सतीष करमकार, सुधाकर करमकार, सुधाम दिपके,अम्रपला येसनकार, पदमाताई दिपके,आशाबाई रामटेके, रंजना थुल, प्रमिला येसनकार, सुजाता येसनकार

आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments