समता सैनिक दलाने एस.टी.महामंडळाच्या विलनीकरण्याच्या लढ्याला दिला पाठिंबा*


  𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜 | 𝚠𝚊𝚛𝚍𝚑𝚊. 

*समता सैनिक दलाने एस.टी.महामंडळाच्या विलनीकरण्याच्या लढ्याला दिला पाठिंबा*

वर्धा:जो पर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण होत नाही व या लढ्याला यश येत नाही तसेच या सोबत इतरही मागण्या पुर्ण होत नाही, तो पर्यंत समता सैनिक दल सदोदित आपल्या पाठीशी उभे राहील असे आश्वासन समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे यांनी एस.टी.महामंडळाच्या सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर करतांना दिले.

   दिनांक २७/१०/२०२१ पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या सुरू असलेल्या आंदोलनातून खालील प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत.त्यात प्रामुख्याने१) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे.२)राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा(उदा.रेल्वेचा अर्थसंकल्प केंद्रसरकारच्या अर्थसंकल्पात समाविष्ट)

३)एस.टी.कामगारांना समान काम ,समान दाम या तत्वावर किमान वेतन कायद्यानुसार १ एप्रिल २०१६ पासून १८०००/-रु.मुळ वेतन(बेसिक)मिळावा.४)७ व्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता प्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावे.आदी मागण्यांचा समावेश करण्यात आलेल्या आहे.

    यावेळी आदोलनस्थळी समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपभाऊ कांबळे, अविनाश गायकवाड, मनोज थुल,यशवंतराव पाटील,पुंडलीकजी गाडगे,रंगरावजी वाकोडे तसेच वर्धा आगारातील सर्व कामगार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments