Vidarbh tiger news |selu
*स्त्रियांना आज जे हक्क मिळाले ते फक्त सावित्रीबाई मुळेच-प्रा ममता राऊत*
सेलू:"मनुस्मृती मध्ये स्त्रियां विरोधी लिहिल्या गेल्या असल्यामुळे स्त्रियांनी शिकणे किंवा शिकविणे पाप समजल्या जात असे. त्यांना देव,धर्मग्रंथ, शास्त्र,रुढी परंपराच्या बंधनात अडकवून गुलाम बनवून ठेवले होते. शिक्षण नाही,स्वातंत्र्यही नाही. त्यामुळे त्या आपले दु:ख मुक्तपणे मांडू शकल्या नव्हत्या. पिढ्यानपिढ्या निमूटपणे दु:ख सहन करणा-या स्त्रियांच्या दु:खाला,वेदनांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वाचा फोडली. तिने घराघरात शिक्षणाचा प्रकाश नेला आणि स्त्रियांना जे आज हक्क मिळाले ते फक्त सावित्रीबाई मुळेच"असे विचार यशवंत महाविद्यालय सेलूच्या प्रा.ममता राऊत(कुंभारे)यांनी प्रतिपादित केले.
त्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सेलू येथे 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्रिशिक्षण व सामाजिक कार्य' या विषयावर विचार व्यक्त करतांना प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राकेशकुमार कोडापे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.कानेरे मँडम,आहाके मँडम या होत्या.
प्रा.ममता राऊत पुढे म्हणाल्या की,सावित्रीबाईंनी दगड, माती,शेण अंगावर झेलून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. चिकित्सक व विज्ञानवादी द्रुष्टीकोन स्विकारुन
अनिष्ट चालीरीती, भाकड कथा, पोथी पुराणाच्या ऐवजी स्त्रियांनी सावित्रीबाईच्या विचारांचे अनुकरण करावे हेच खरे सावित्रीबाईंना जयंतीनिमित्त खरे अभिवादन ठरेल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित गीत गायले.
याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य राकेशकुमार कोडापे यांच्या हस्ते प्रा.ममता राऊत यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतीमा भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु.प्राजक्ता गडकरी हिने तर उपस्थितांचे आभार कु.धनश्री मुडे हिने मानले. याप्रसंगी संस्थेतील सर्व महिला प्रशिक्षणार्थी व महिला कर्मचारी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment