आर्वीतील महाराणा प्रताप वार्ड येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न*

Vidarbh tiger news| arvi,


 आर्वीतील महाराणा प्रताप वार्ड येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न*

      आर्वी: तालुक्यातील महाराणा प्रताप वार्ड येथे समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची ग्राम शाखा स्थापन करण्यासंदर्भात सभा संपन्न झाली. 

      यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सुरक्षा प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे,आर्वी तालुका संघटक प्रफुल काळपांडे,वर्धा तालुका संघटक मनोज थुल, रिपाइंचे अमोल दाभणे,मार्शल पप्पु पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

      सदर सभेला अभय कुंभारे यांनी समता सैनिक दल काळाची गरज या विषयावर संबोधित करतांना तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल या मात्रुसंघटनेत मोठ्या प्रमाणात सामिल होऊन संघटनेला मजबुती प्रदान करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन विकी शेंडे तर उपस्थितांचे आभार सचिन वहाणे यांनी मानले.

   यावेळी अर्पित वहाणे,लक्ष्मण रोडे,संजय भोयर,सुदाम वाहाणे,नितीन फुले, रमेश वाहणे,सुनील सरदार, संजय रामटेके,उत्तम वहाणे,नितीन दुधे,अरुणा मोटघरे,रमा मोटघरे, मोना मोटघरे,कोजील मोटघरे, माया मोटघरे,शालु गुलभाई,प्रतीभा नाखले,सविता वहाणे,पुनेश शेंडे,सुलोचना मोटघरे,शीला वहाणे,संगीता वहाणे,विमल मेश्राम,माया शेंडे,अर्चना नाखले

आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Like and subscribe

👇👇👇



Comments