सिंदी(मेघे)येथील नागरिक ५वर्षांपासून पिण्याचे पाणी व विद्युत पुरवठ्यापासून वंचित*

Vidarbh tiger news| wardha

 *सिंदी(मेघे)येथील नागरिक ५वर्षांपासून पिण्याचे पाणी व विद्युत पुरवठ्यापासून वंचित*

          वर्धा शहरालगतच्या सिंदी(मेघे)येथील भुखंड क्रमांक १५८/१ येथे मागील पाच वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असलेल्या झोपडपट्टी वासीयांना ग्रामपंचायत कडून मुलभूत सोयी पुरविण्यासाठी नागरिकांनी सतत मागणी करुनही साधा पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्यात येत नाही. यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती होऊ शकते.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून हा प्रश्न जगासमोर उपस्थित केला होता आणि भारतीय संविधानात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही अशी तरतूदही केलेली आहे.

   


  मात्र असे असतांना स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सिंदी(मेघे) या गावातील काही नागरिक मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत आहेत.तसेच या झोपडपट्टीला लागून असलेल्या वनांमधून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्यामुळे विजेचा पुरवठा करण्यात यावा अशी साधारण मागणी करीत आहोत.

         या झोपडपट्टीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ते आजच्या विज्ञान युगातही दिव्याखाली अभ्यास करीत आहेत. ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय बाब आहे. ग्रा.प.सिंदी(मेघे)नागरीकांच्या या मागण्यांकडे का लक्ष देत नाही हे न उलगडणाऐ कोडे आहे.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही त्यांनी एखाद्या राखीव निधीतून पिण्याचे पाण्यासाठी हापशी व विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज दिले आहेत. त्यांच्या कडूनही त्यांना वाटाण्याच्या अक्षदाच देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याची चाहूल सुरू झालेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच या ठिकाणी अनेक अपंग, व्रुद्ध नागरीकांना वैद्यकीय मदतीचा प्रश्न,विद्यार्थ्यांना आँनलाईन अभ्यास करण्यासाठी चार्जिंगचा प्रश्न आदी अनेक अडचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे.करीता या सर्व बाबी स्थानिक प्रशासनाने लक्षात घ्याव्या आणि आवश्यक सोयी त्वरीत उपलब्ध करून द्याव्यात अशी तेथील नागरीकांची मागणी आहे.


        ग्रा.प.सिंदी(मेघे) सरपंचा किर्ती सवाई तसेच जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल, पप्पु पाटील, वंदना वासनिक,चंद्रकला पखाले, लीला सिरसाम,सुमन फुलझले, सुष्मा मरापे,विद्या कोवे,रत्नमाला रामटेके,अश्विनी गजभिये, रमा गजभिये, सीमा रामटेके, मुन्नी मेश्राम, उषा मरसकोल्हे,सुषमा मरापे,प्रतीभा मून,मीना रामटेके, विद्या कोवे,दिपाली ईंगोले,चंद्रकला पखाले,लिला शिरसाम,सुमन फुलझेले, वंदना वासनिक, वंदना फुलझेले, प्रिती शिंगणापूरे,दिपा घाटे, निर्मला शेंदरे,जया उईके, अनुसया राऊत,वनिता नरड,कल्पना मठ्ठे,नलु ईरपाते,उषा धुर्वे,साधना चव्हान,सोनाबाई दुधभेळे,आशा बगळे,विमल जांभुळकर,माधुरी ढाले,शोभाबाई मडावी,कांता पाठक,सावण गरगिरे,संध्या गजभिये,अंजु भेडांरे,गंगाबाई गजघारे,आकाश खापरडे,माधुरी खडसे,विमला फुगे,भारती सरकटे,शेवंताबाई इंगोले,अर्चना वाटगुळे,बेबी महाडोळे,मंदा मरापे,रंजना शेळके आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments