अमरावतीच्या विजय खंडारे(youtuber) ने केला वेगळाच प्रयोग |shrivalli song marathi version


 𝚅𝚒𝚍𝚊𝚛𝚋𝚑 𝚝𝚒𝚐𝚎𝚛 𝚗𝚎𝚠𝚜 |𝚊𝚖𝚛𝚊𝚟𝚊𝚝𝚒

Hello Maharashtra ,

आज ची न्यूज निंबोरा तालुका तिवसा जिल्हा अमरावतीतून आहे ,

न्यूज:-shrivalli हे song YouTube star विजय खंडारे सर ने मराठी मध्ये प्रदर्शित केले आहे .

तुम्हाला माहीतच आहे की ,श्रीवल्ली हे song तेलगू भाषेतील pushpa the raise या चित्रपटातून  release झाले होते .shrivalli साँग व चित्रपट पुढे मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे.pushpa the raise हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे .

आता या चित्रपटातील shrivalli या गाण्याच्या मराठी version चे social media खूप धूम सुरू आहे.हे गाणे तिवसा तालुक्यातील निम्बोरा गाव येथील विजय खंडारे याने तयार केले आहे.आता पर्यंत या गाण्याला 24 लाख लोकांनी पाहिले असून 1 लाख 9 हजार जणांनी पसंती दिली आहे.

चित्रपटा प्रमाणे चार भाषेत हे गाणेही तयार झाले आहे .विजयने दोन आठवड्यापूर्वी मराठी भाषेत हे गाणे यूट्यूब वर टाकले . त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.विशेष म्हणजे ,विजयने स्वतः हे गाणे हिंदीतून मराठीत अवघ्या दोन तासांत तयार केले . अमरावती च्या एका स्टुडिओत ते रेकॉर्ड केले . त्यानंतर शूटिंग करण्यात आले . विजय ने पुष्पाची आणि त्याची पत्नी तृप्तीने श्रिवल्ली ची भूमिका या गाण्यात केली आहे. 3 मिनिटे 44 सेकंदा चे हे गाणे आहे  .

चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन, अभिनेत्री रश्मिका मंदना तसेच या गाण्याचा मूळ गायक श्रीथ श्रीरावसह चित्रपटाच्या चमूनेही आपले गाणे पाहिले असल्याचे विजय खंडारे याने सांगितले विजपला या गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी तीन दिवस लागले. सहकलाकार म्हणून गावातीलच राधिका नागरगोटी, सुहासिनी गुल्हाने, मनीष पतंगे, रोशन चौधरी यांनी उत्तम भूमिका साकारली आहे.


विजय खंडारे युट्यूबवर तसा प्रसिद्ध आहे. पत्नी तृप्तीला सोबत घेऊन तो ग्रामीण जीवनाशी निगडित आसपास घडणारे किस्से यावर अभ्यासपूर्ण व्हिडीओ बनवतो. त्याचे बहुतांश व्हिडीओ विनोदी असल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पूर्वी विजयची टिक टॉक स्टार म्हणून ओळख होती.


एखादा व्हिडीओ बनवायचा असल्यास खर्च येतो. व्हिडीओत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार महागडे कपडे परिधान करतात. पण विजय आणि त्याच्या चमूने कमी खर्चात हे गाणे बनवले आहे. तो आणि त्याच्या पत्नीने अगदी साध्या पेहरावात या गाण्याचे शूटिंग केले आहे. कॅमेरामन म्हणून त्याची बहीण आचलने सहकार्य केले.


विजय सामान्य कुटुंबातील विजय अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेला युट्यूब स्टार आहे. विजयचे वडील नारायण खंडारे हातगाडीवर छोटा व्यवसाय करतात. त्याची आई गृहिणी आहे. विजयने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून पूर्वी त्याने हमालीचे कामही केले आहे. जिद्द आणि कला त्याच्या अंगी आहे. यातूनच तो लोकांच्या पसंतीला उतरला आहे.

YouTube chi link.                                                







Comments