समता सैनिक दल आर्वी शाखेची मागणी* *-मुख्याधिकारी न.पा.आर्वी यांना दिले निवेदन*

vidarbh tiger news,

 *समता सैनिक दल आर्वी शाखेची मागणी*

*-मुख्याधिकारी न.पा.आर्वी यांना दिले निवेदन*

आर्वी: महाराणा प्रताप वार्ड कन्नमवार शाळेजवळ असलेल्या धम्म ध्वजाजवळ भव्य बुद्ध विहार, (सांस्कृतिक सभागृह) तसेच विद्यार्थ्यांकरीता वाचनालय व अभ्यासिका तसेच प्रवेशद्वाराकरीता निधी उपलब्ध करून देण्याविषयीचे निवेदन समता सैनिक दल शाखा आर्वीच्या वतीने शाखा संघटक अर्पित वहाणे यांच्या नेतृत्वाखाली मा.मुख्याधिकारी नगर परिषद आर्वी यांना देण्यात आहे.

    मागील अनेक वर्षांपासून प्रताप वार्ड येथील नागरिक सदर मागणी करीत आहेत आणि सातत्याने त्या मागणीचा पाठपुरावा सुद्धा करीत आहेत. आर्वी सारख्या ठिकाणी सांस्कु्तीक सभागृह नसाल्यामुळे विविध सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती करावी. तसेच महाराणा प्रताप वार्ड कन्नमवार शाळा परिसरातील धम्मध्वजाजवळ विद्यार्थ्यांकरीता वाचनालय व अभ्यासिका तसेच सांची प्रतीक्रुतीचे प्रवेशद्वार उभारण्याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

     यापूर्वी अर्पित वहाणे व नागरिक यांनी विद्यमान आमदार दादाराव केचे व माजी आमदार अमर काळे यांना सुद्धा याविषयीचे निवेदन सादर केले आहे. यावेळी निवेदन देतांना प्रताप नगर शाखा संघटक अर्पित वहाणे,गोपाल,शेन्डे,आर.बी.मोटघरे,सागर मोटघरे,नितीन फुले,प्रशांत वाहाणे आदी पदाधिकारी व मार्शल उपस्थित होते.

Comments