आंबेडकरी संघटनेच्या शेकडो महिला पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसोबत समता सैनिक दलात जाहीर प्रवेश*


 *आंबेडकरी संघटनेच्या शेकडो महिला पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसोबत समता सैनिक दलात जाहीर प्रवेश*

 आर्वी: भिमोदय बुद्ध विहार,दत्त वार्ड आर्वी येथे समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक आणि विहार तिथे वाचनालय या अभियानांतर्गत महिला शाखा स्थापन करण्यासंदर्भात सभा पार पडली. 

    या सभेत आर्वी येथील आंबेडकरी चळवळीत कार्य करणा-या विविध संस्था,पक्ष व सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिका-यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत समता सैनिक दल या मात्रुसंघटनेत जाहीर प्रवेश केला.

       या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित महिला पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि समता सैनिक दलाच्या बांधणीसाठी व संघटनेला मजबुती प्रदान करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.

    यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रतिबद्धतेची शपथ देण्यात आली.या सभेचे संचालन व आभार भारती बन्सोड यांनी केले.

    यावेळी सभेला सुरेखा भगत, रंजना ठवके,एल.डी.चाहांदे,मंदा धनगर, पदमा सवाई, सुशिला काळपांडे, प्रिती अधव,चंद्रकला कांबळे, मयुरी काळपांडे, नंदा पाटील, निर्मला सवाई, शिला काळपांडे, मनोरमा काळपांडे, अमिता काळपांडे,रकमा डुकरे,प्रियंका गुजर,जयश्री मेश्राम,नर्बदा वानखेडे,रंजना काळे,रंजना ढवळे,प्रफुल काळपांडे,अमोल दाभणे आदी उपस्थित होते.


                                Subscribe

Comments