*उन्हाळ्यापुर्वी पाणी व विद्युत दिव्याची सोय करा- सिंदी(मेघे)येथील झोपडपट्टी वासीयांची मागणी*

Vidarbh tiger news,

 *उन्हाळ्यापुर्वी पाणी व विद्युत दिव्याची सोय करा- सिंदी(मेघे)येथील झोपडपट्टी वासीयांची मागणी*

*-जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक*

वर्धा: मौजा सिदी(मेघे)येथील वार्ड क्रमांक-१५८/१ येथे राहत असलेल्या झोपडपट्टीमध्ये पाणी व विद्युत दिव्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत तसेच यापूर्वी दिलेल्या निवेदनावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अशा मागणी झोपडपट्टी वासीयांनी मा.जिल्हाधिकारी,वर्धा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

      मौजा सिंदी(मेघे)येथील नागरिक सर्वे क्रमांक १५८/१ या भुखंडावर मागील काही वर्षांपासून झोपड्या बांधून राहत आहेत.आम्ही सर्व नागरिक मजूरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतो. परंतु आम्हाला ग्रामपंचायत कडून कोणत्याही सोयी पुरविण्यात आल्या नाहीत.आम्ही ग्रामपंचायतचे पदाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही साधा विज पुरवठा व पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करून देण्यात आली नाही.येथील जि.प.सदस्य हा आमच्या झोपड्या हटविण्याच्या प्रयत्नात असून शासन- प्रशासनाला खोट्या माहिती देऊन

 दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

   तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी प्रजासत्ताक दिनी नागरिकांना संबोधित करतांना कुणालाही बेघर करता येत नाही असे आश्वासन देऊन झोपडपट्टी वासीयांना दिलासा दिला होता.त्याचप्रमाणे मा.जिल्हाधिकारी यांनी सुद्धा झोपडपट्टी वासीयांना मग ती जागा महसूलची असो की वनविभागाची त्यावर कायमस्वरूपी पट्टे देण्यात येतील असे जाहीर केले होते. मात्र आम्ही या जागेवर मागील पाच वर्षांपासून राहत असून आमच्या झोपड्या हटविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.यामागचे नेमके कारण म्हणजे आमच्या झोपड्या हटविण्यासाठी कोणतेही कारण न मिळाल्यामुळे जि.प.सदस्य व ईतरांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी आपणाकडे खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

   आमच्या मधील कुणीही दारू, गांजा आदी वस्तूची विक्री करीत नाही.त्यामुळे त्यानी रामनगर परिसरातील समाजकंटकाला तेथे आणून अवैध दारू विक्री सुरू केली आहे.ही बाब रामनगर पोलीसांना माहीत आहे. त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही.

     दिनांक १५/०२/२०२२ रोजी मौजा बोरगाव येथील ईसमाने दारु पिऊन आमच्या झोपडपट्टीतील एका ६५ वर्षीय व्रुद्ध महिलेचा गळा पकडून जबरदस्तीने ओढत नेले आणि झोपडपट्टी पासून लांब नेऊन अंधाराचा फायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यामध्ये फार मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे.

कारण आमच्या झोपड्यांपासून अर्धा किलोमीटर अंतरावर टेकडीवर बुद्ध विहार बांधलेले आहे. त्यांच्या जवळ ग्रा.प.वतीने हायमास्ट लाईट देण्यात आले आहे.मात्र जि.प.सदस्याच्या दबवामुळे तो लाईट लावण्यात येत नाही.त्यामुळे असे प्रकार होत असतात.त्यांचा आमच्या झोपडपट्टीशी

कोणताही संबंध येत नाही.मात्र आम्हाला वारंवार धमक्या देऊन झोपडपट्टी हटविण्याची कार्यवाही करू असे सांगण्यात येते.

आपण ही बाब गंभीरतेने घ्यावी आणि वरील सर्व प्रकारची चौकशी करावी.

    दिनांक १७/११/२०२१ रोजी मा.तहसीलदार यांच्या कक्षेत झालेल्या जि.प.सदस्य,सरपंच,ग्रामविकास अधिकारी आणि नागरिकांच्या झालेल्या सभेत ठरविण्यात आले होते की,या झोपडपट्टी वासीयांना दिड महिण्याच्या आत पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अन्यथा आहे त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी पट्टे द्या.मात्र यात ४ महिण्याचा कालावधी उलटून गेला असला तरी ग्रा.प.कडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.मा.महोदया आपणास आमची एकच विनंती आहे की,आमच्या झोपडपट्टया हटविण्यात येऊ नये आणि आम्हाला उन्हाळा लागण्यापूर्वी विद्युत आणि पाण्याची व्यवस्था करून द्यावी.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

  यावेळी निवेदन देताना महिला प्रतिनिधी वंदना वासनिक, चंद्रकला पखाले, प्रिती सिंगणापुरे,रत्नमाला रामटेके,प्रिती आष्टेकर,गणेश खेलकर, प्रतीभा मून,निर्मला शेंदरे,विमल फुगे,जया ऊईके,विद्या कोल्हे,सोनाबाई दुधकोहळे,शुष्मा मरापे,मंदा मरापे,आशा नानवटकर,मुन्नी मेश्राम, रमा गजभिये,प्रतिभा, सुमन मरस्कोल्हे,मिना रामटेके,आदी उपस्थित होते.

Comments