समता सैनिक दल महिला विंग आर्वीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा*


 Vidarbh tiger news| arvi.      

*समता सैनिक दल महिला विंग आर्वीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा*

आर्वी:स्थानिक भिमोदय बुद्ध विहार,दत्त वार्ड येथे समता सैनिक दल महिला विग आर्वीच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा संघटिका बन्सोडताई या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सायन्स ज्युनियर कालेजच्या प्रा.विजया मुडे,सामाजिक कार्यकर्त्या करुणा दाभणे,डुकरे ताई या प्रामुख्याने होत्या.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला समर्पिता रमाई आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,तथागत बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. 

    अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना भारती बन्सोड म्हणाल्या की, जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्काचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या द्रुष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करून आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले पाहिजे असे प्रतिपादन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपले समयोचित विचार व्यक्त केले .

    कार्यक्रमाचे संचालन सुरेखा भगत यांनी तर उपस्थितांचे आभार ललिता चहांदे यांनी मानले.

   यावेळी चंद्रकला कांबळे,नंदा पाटील, निर्मला सवाई,नलिनी मनवर,पदमा काळे,रिना चौरपगार,सुरेखा उबाळे(भगत),माया पाटील,रंजना ठवळे,प्रगती मुंद्रे,शितल नेवारे,मनोरमा काळबांडे,शिला काळबांडे, कोमल मुंद्रे,अमिता काळबांडे, निलिमा काळबांडे,रुखमा डुकरे,उषा नाखले करुणा ताभने आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



                              Subscribe





Comments