शहिद दिनी आर्वी तळेगाव महामार्ग कृती समिती द्वारा भव्य चक्का जाम आंदोलन*


Vidarbh tiger news| arvi 

*शहिद दिनी आर्वी तळेगाव महामार्ग कृती समिती द्वारा भव्य चक्का जाम आंदोलन*

      मागील चार वर्षापासुन तळेगाव ते आर्वी रोडचे काम बंद पडून आहे. मंजुरी मिळाली तेव्हापासुन ते आता पर्यंत अनेकदा काम बंद पडले व नंतर ते सुरू झाले. तसेच ज्या ज्या वेळेला पावसाळा सुरू झाला अगदी त्या वेळेला काम बंद केले गेले. संपूर्ण रोडच फक्त खोदकाम सुरू आहे रोड पूर्ण व्हायला किती वेळ लागेल यावर कुणी बोलायला तयार नाही. रोड साठी आलेला निधीचे काय केले हे कुणी सांगत नाही. मात्र याचा त्रास सर्व सामान्य जनतेला होत असून मागील चार वर्षात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला.

         त्यासाठी आज दी. #23_मार्च ला #शहीद_ए_आझम_भगत_सिंह यांच्या फोटोला अभिवादन करत आर्वी तळेगाव रस्त्यावर भव्य चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

           मुर्दाड प्रशासन व मुजोर कंत्राटदाराच्या विरोधात यावेळी घोषणा देत टायर जाळत 2 तास रस्ता बंद ठेवण्यात आला.यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार,नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. गेली 4 वर्ष या रस्त्याचे काम पूर्णपणे थांबलेले आहे. जिल्ह्यातील आमदार,खासदार या संबंधाने बोलायला तयार नाही. या रस्त्याशी संबंधित अधिकारी काहीही स्पष्ट बोलताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाला जागं करण्यासाठी आज चक्का जाम करण्यात आले.2 तास चाललेल्या या आंदोलनाला नायब तहसीलदार यांनी भेट देत आम्ही समंदीत अधिकाऱ्यांशी आपली बैठक लावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर महामार्ग प्रवाशांसाठी खुला केला गेला. त्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार चव्हाण साहेब यांना निवेदन देत येत्या 8 दिवसात संबंधित मुख्य कार्यकारी अभियंता नागपूर बोरकर साहेब व संबंधित कंत्राटदार यांनी स्थानिक आर्वी येथे कृती समितीसोबत बैठक लावून चर्चा करावी अन्यथा कृती समिती हजारो कार्यकर्त्यांसह मुख्य कार्यकारी अभियंता नागपूर यांच्या कार्यालयाला घेराव घालत कार्यालयाला टाळे ठोकेल असा निर्वाणीचा इशारा यावेळी दिला गेला.

      यावेळी संभाजी ब्रिगेड ,एम आई एम, भीम टायगर सेना, सच बोल सच तोल ग्रुप, वंचित बहुजन आघाडी सहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त आंदोलनात सहभागी होते.

                


                              Subscribe

               

Comments