Vidarbh tiger news |हिंगणघाट
*प्रियदर्शी सम्राट अशोक बुद्ध विहार, कुटकी येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न*
*हिंगणघाट*: प्रियदर्शी सम्राट बुद्ध विहार ,कुटकी तालुका हिंगणघाट येथे समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची ग्राम शाखा स्थापन करण्यासंदर्भात नुकतीच सभा संपन्न झाली.
यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सुरक्षा प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल,ज्येष्ठ मार्गदर्शक राजकुमार कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर सभेला अभय कुंभारे यांनी समता सैनिक दल काळाची गरज या विषयावर संबोधित करतांना तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल या मात्रुसंघटनेत मोठ्या प्रमाणात सामिल होऊन संघटनेला मजबुती प्रदान करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन तालुका संघटक मनोज थुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार नरेंद्र नरांजे यांनी मानले.
यावेळी कुणाल शंभरकर,रुपेश थुल,सुमेध कुंभारे, गौतम सोगे,सागर कुंभारे,सुरज भगत,विशाल कुंभारे,व्रुषभ सातकर,रमाबाई तेलंगे,कौसाबाई कुंभारे,राजदत्त झामरे,रेश्माबाई वावरे,चंद्रकला जगताप,वैजयंती कुंभारे,संगिता काटकर,आशा सोगे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment