आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज... अभय कुंभारे यांचे प्रतिपादन*


 vidarbh tiger news | wardha

*आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज... अभय कुंभारे यांचे प्रतिपादन*                  

      वर्धा : जागतिक स्तरावर तिसऱ्या विश्व युद्धाची काही देश जानूनबूजून परिस्थिती निर्माण करीत आहेत. दुसरीकडे मीच सर्वात बलाढ्य असा आव आणनारे देश आपले पृथ्वी विनाशक शस्त्र विकण्याची सतत धड़पड करणारे, स्वयंघोषीत विकसीत देश महायुद्धाची तैयारी करीत आहेत.परमाणु बॉम्ब व मिसाइलचे परिक्षण या देशांनी सतत सुरु केले आहे. या देशांच्या संहारक विचाराने मनुष्य जीवन हादरून गेले आहे. तथागत बुद्ध जन्मलेल्या भारत देशाचीही हीच अवस्था आहे. आज या बिकट व जीवघेण्या परिस्थितीत जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाच्या विश्वशांती, अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा या मानवतावादी विचाराची अत्यंत आवश्यकता आहे,असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे वर्धा ज़िल्हा संघटक अभय कुंभारे यांनी केले.

      ते तथागत बुद्ध तसेच क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती प्रतिष्ठापना प्रसंगी सारनाथ बुद्ध विहार, कोल्हापुर सिंगारवाडी येथे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते चित्तज्योती, विशेष अतिथी म्हणून इंडो -जापान इंटरनेशनल पीस एंड ह्यूमन राइटस मिशन चे नेशनल कन्वेनर प्रा. डॉ. एडवोकेट प्रफुल मून,तर प्रमुख अतिथी म्हणून जागृती व्यसनमुक्ति केंद्राचे राष्ट्रीय संचालक दादाराव मून देवळी,वैशाली बुद्ध विहार, येरणगांव वडनेरच्या संचालिका लतासोपान नगराळे , सदधम्म प्रचारक सुधीर वानखेड़े अमरावती,विश्वेश्वर हाडके गुरूजी, एडवोकेट उमरे हे होते. कार्यक्रमध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनीही बुद्ध -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी मानव उत्थानवादी विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमांचे संचालन भारतीय बौद्ध महासभेच्या चारुशीला मून यांनी केले तर उपस्थितांचे आभार समता सैनिक दलाचे मार्शल धम्मरत्न कांबळे यांनी मानले. 

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला समता सैनिक दलाच्या वतीने पथसंचालन करण्यात आले.त्यानंतर समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले.यावेळी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती दान करणारे शांताबाई ढोरे व गौतम लोहकरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे,मार्शल सुबोध, धम्मरत्न कांबळे,वैभव काबळे,हर्षल मुंजेवार विद्यानंदजी भगत,रामेश्वर अलोणे,सचिन कांबळे, दिपक कांबळे, अनूज कांबळे स्वप्निल कांबळे, विपुल कांबळे,संघशील लोहकरे, चंद्रशेखर गायकवाड,नितीन ढोरे, बबलू ओरके,प्रितम कांबळे,सुजल कांबळे,विपुल वाळके,अभय बेंदले,सुरज राऊत, योगेश ताकसांडे, प्रियांशु कांबळे, रोशन ताकसांडे,प्रविण कांबळे, प्रफुल कांबळे,प्रदीप कांबळे, महेंद्र कांबळे, गंगुबाई लोहकरे, रश्मी राऊत,सुखरामजी ढोरे,संदीप ढोरे,विपुल भगत, रंजित राऊत,सुमेध कांबळे, अमित लोहकरे,यांनी विशेष परिश्रम घेतले.

_______________________________________

निळाई काव्य संमेलन धम्म टेकडी तळेगाव शामजी पंत तहसील आष्टी जिल्हा वर्धा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇


Subscribe|like | share


Comments