Vidarbh tiger news | wardha
*जोपर्यंत महिलांना सर्व स्तरावर समानता प्राप्त होत नाही तोपर्यंत महिला सबलीकरण झाले असे म्हणता येणार नाही *-सुमनताई बागडे*
*समता सैनिक दल महिला विंगच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन*
वर्धा: काही मोजक्या महिलांची प्रगती झाली म्हणजे सर्व स्त्रियांचा विकास झाला असे म्हणता येत नाही. आज एकही दिवस असा उजाडत नाही ज्या दिवशी महिलांवर अन्याय, अत्याचार, अमानुष छळ किंवा बलात्कार होत नाहीत. आजही ग्रामीण भागात महिलांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते. ग्रामीण भागातील महिला आजही रुढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये रुतलेल्या आहेत जो पर्यंत ग्रामीण भागातील महिलांना सामाजिक,आर्थिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक पातळीवर समानता प्राप्त होत नाही तोपर्यंत महिला सबलीकरण झाले असे म्हणता येणार नाही.जेव्हा महिला ख-या अर्थाने सक्षम होतील तेव्हाच सम्रुध्द राष्ट्र निर्माण होईल. म्हणून आजच्या या महत्वपुर्ण दिवशी असा संकल्प करु या की, गावातील प्रत्येक तरुणीला स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी मदत करेन आणि मी महिलांवर अत्याचार करु देणार नाही, तीला जे हवं ते मिळवून देण्याचा प्रयत्न करीन.तेव्हाच महिलांचे सबलीकरण झाले असे म्हणता येईल. असे प्रतिपादन सुमनताई बागडे यांनी केले.
त्या समता सैनिक दल वर्धा जिल्हा महिला विंगद्वारा आयोजित जय भिम बुद्ध विहार सिंदी(मेघे) येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई बागडे तर प्रमुख अतिथी म्हणून सुनिता डंभारे,चंद्रकला पखाले,प्रिती आष्टेकर, कलावती येसनकर या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून तथागत बुद्ध,प्रियदर्शी सम्राट अशोक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्मिता नगराळे,मालाताई डंभारे, सुनिता गायकवाड,पुष्पाताई कांबळे यांनी गीत गायन केले.प्रमुख अतिथींनी उपस्थित महिलांना समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी बुध्द टेकडी जवळील जागेचे पट्टे मिळण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून समर्थपणे आपल्या हक्कासाठी लढा उभारणा-या रमाई नगर येथील झोपडपट्टीतील महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन रत्ना बन्सोड ह्यांनी केले तर उपस्थितांचे आभार नम्रता थुल यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला सुदर्शना नगराळे,तिरपुडे ताई,वंदना वासनिक, रत्नमाला रामटेके,प्रिती शिंगणापूरे,नम्रता थुल, दिनेश्वरी थुल, ज्योती थुल,रैशना थुल, फुसाटे ताई, मिनाक्षी कोसळे,वनिता धवणे,वनिता वलके,चंदा वाणी,ललिता सयाम,वनिता मून,सुमन फुलझेले,लिला सिरसाम, सविता भगत,जया ऊईके, जयश्री कुंभारे,मुन्नी मेश्राम,सुष्मा मरापे,मुन्नी मेश्राम,उषा मरस्कोल्हे,अश्विनी गजभिये, रमा गजभिये आदी महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment