कविता| झेंडा कुठे लावू| कवी निखिल खडसे


 Vidarbh tiger news|poem.

*झेंडा कुठे लावू*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात

सहभागी आम्ही ही होऊ

पण सांगा ना मोदी साहेब||1||


झेंडा कुठे लावू

राहणं आमचं रस्त्यावर

फुटपाथ आमचं गाव

नागरिक आम्ही देशांचे

भिकारीच आमचे नाव||2||


धान्य स्वस्त असले तरी

अन्न स्वप्नच आहे

एक वेळच जेवण सुद्धा

मोठा प्रश्नच आहे ||3||


आजच्या डिजिटल युगातही 

स्वप्न महागाचे कसे पाहू

सांगा नां मोदी साहेब

झेंडा कुठे लावू ||4||


गरिबांच्या यादीत आज

नाव आमदारांचे आले

आमच्या हिस्याचे मकान

त्यांना वाटप झाले ||5||


तुमच्या तर्कहीन बुद्धीचा विचार

आम्हीही करू शकतो

उघड्यावर राहून साहेब

आम्हीही मरू शकतो ||6||


लावले असते तोरण दाराला 

आधी घरकुल तरी द्याना भाऊ

सांगा ना मोदी साहेब

झेंडा कुठे लावू ||7||


देशप्रेमाची भावना

आमच्या ही मनात आहे

हुतात्माच्या शहिदीचा

आम्हालाही अभिमान आहे ||8||


आझाद देश माझा

आझाद देशाची जनता

रस्त्यावर्ती राहणे आमचे तरी

भारत स्वतंत्र्य झाले म्हणता ||9||


सडलेल्या पत्राचा ढिगाऱ्यावर

बोल राष्ट्रगाना चे कसे गाऊ 

सांगा ना मोदी साहेब

झेंडा कुठे लावू ||10||



युवा कवी :-

निखिल कैलासराव खडसे

तळेगाव (शा. पंत)

8459167410

Comments