*विश्वशांती बुद्ध विहार उमरी(येडे)येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न*
*हिंगणघाट*: विश्वशांती बुद्ध विहार ,उमरी(येडे) तालुका हिंगणघाट येथे समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची ग्राम शाखा स्थापन करण्यासंदर्भात नुकतीच सभा संपन्न झाली.
यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक मार्शल अभय कुंभारे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका संघटक मार्शल मनोज थुल,ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिकजी गाडगे,दिगांबरजी लांबे,झोपडपट्टी संघर्ष समिती सिंदी(मेघे) अध्यक्षा वंदनाताई वासनिक ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर सभेला अभय कुंभारे यांनी 'समता सैनिक दल आज काळाची गरज'या विषयावर संबोधित करतांना तरुणांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल या मातृसंघटनेत सामिल होऊन संघटनेला मजबुती प्रदान करण्याचे यावेळी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन तालुका संघटक मनोज थुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुजाता फूलकर ह्यांनी मानले.
यावेळी सभेला मार्शल चंदु भगत, प्रितीताई आष्टेकर,नम्रताताई थुल, सानिया थुल,सुरज फूलकर,अमोल भिमटे,विमल फूलकर,वंदना फूलकर,गंगा गायकवाड, सुजाता माणिक फूलकर, छाया फूलकर, दिक्षा फूलकर, सुजाता प्रशांत फूलकर,आशा बबन फूलकर, वंदना धनपाल फूलकर, शारदा कुचलकर, बेबी फूलकर, शोभा फूलकर, अनिता फूलकर, पी.एम.फूलकर, करिश्मा फूलकर, भारत फूलकर, अशोक सोनटक्के, सुशांत फूलकर,भैय्याजी दा.फूलकर, रविंद्र र.फूलकर भगवान फूलकर आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment