समता सैनिक दलाची कार्यकारिणी* *गठीत व शाखा फलकाचे अनावरण*


 *समता सैनिक दलाची कार्यकारिणी* *गठीत व शाखा फलकाचे अनावरण*

हिंगणघाट:स्थानिक पिंपळगाव येथील के.डी वाचनालय येथे गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक व विहार तेथे वाचनालय या अभियानांतर्गत गाव शाखा स्थापन करण्यासंदर्भात समता सैनिक दलाची सभा पार पडली.

 या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक पुडलीकजी गाडगे,दिगांबरजी लांबे, तालुका संघटक मनोज थुल, झोपडपट्टी संघर्ष समिती वर्धेच्या वंदनाताई वासनिक, प्रितीताई आष्टेकर,सामाजिक कार्यकर्ते ढगेश्वर मून हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

  यावेळी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दल पिंपळगाव ग्राम शाखेची कार्यकारिणी गठीत करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

      शाखा संघटकपदी निकेश भगत,शाखा सहसंघटक अरहंत मून,शाखा निमंत्रक संशील शंभरकर,शाखा कोषाध्यक्षपदी सुयोग ढोरे यांची निवड करण्यात आली.

 तर सदस्य म्हणून प्रजोत शंभरकर, यश पोथारे,आयुष नगराळे,महेंद्र थुल,कु.अनिषा पोथारे,कु.शर्वरी लीहितकर, कु.निधी बाराहाते,नैतिक शंभरकर,प्रबोध भगत,नैतिक पोथारे, मयंक पोथारे,मयंक पोथारे,आशुतोष बुटले,आयुष थुल,स्वप्निल लोखंड,क्रुतिका बुटले,क्रुतिका तामगाडगे,प्रशिक गायकवाड, दिपांशू शंभरकर यांची निवड करण्यात आली.या सभेचे सुत्रसंचालन व आभार निकेश भगत यांनी केले.

    यावेळी सभेला मार्शल चंदु भगत,अमोल ताकसांडे, नम्रता थुल, सानिया थुल,अनन्या बाराहाते, चैताली लोखंडे, साची बाराहाते, रत्नमाला मून,रंजना मून,प्रबोध भगत, स्वरूप पोथारे, प्रयास शंभरकर, सुयोग ढोरे,उर्वेश तामगाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments