माझा शेतकरी बाप| poet nikhil khadase


 *माझा शेतकरी बाप*


*ऐन सना-सुगी च्या दिवसावर अतिवृष्टी झाली म्हणे*

*तसाच माझ्या बापाच मन कोवळ्या गुलाबासारखं झालंय....*

*डोळ्यादेखत उभ पीक नेस्तनाभूत होताना पाहून*

*भर पावसाच्या धारेत सुद्धा बापाला माझ्या मी रडताना पाहिलंय.....*


*त्याच्या रडन्याच कारण हा जुलमी पाऊस नव्हताच*

*असे हजार पटीचे वार तो झेलू शकतोय त्याच्या निधळ्या छातीवर....*

*पण जर का हट्ट केला लेकराने माझ्या तर काय उत्तर देऊ*

*कारण शौकाच्या बाजारात भावनेला किंमत शून्य तीथे खेळ चालत असतो फक्त छापलेल्या कागदाच्या नोटीवर....*


*देशाला पोसणारा पोशिंदा आमचा...जगाच्या पाठीवर भारताची कृषिप्रधान देश म्हणून ओळख करून देतोय....*

*आणि देशांत माझ्या... पिकाचे नुकसान होण्याच कारणं खरंच अतिवृष्टी च होती का*

*हा न लागणार तपासच माझ्या बापाच्या मनाला काट्यासारखा सलतोय....*


*श्रीमंतच्या यादीत आज सातबाऱ्या नावावर असणाऱ्याचे नावं नसेलही कदाचित पण*

*कोट्यावढी रुपये कामवणारा अंबानी सुद्धा या यादीत मला फिका वाटतोय....*

*आनंदाच्या क्षणावर मी माणसाला मोकळ्या मनाने हसतांना बघितले*

*पण हसून दाखवा सुखात तुम्ही..*

*जसा माझा बाप कर्जबाजारात कंगाल होऊन सुद्धा हसतोय .....*


*पैसा-अदला यांला माझ्या बापाने कधीच महत्व दिल नाही*

*या पेक्षाही बापाला माझ्या लेकरांची स्वप्न मोठी वाटतात...*

*आणि परदेशी लेकरं माझी शिकून डॉक्टर व्हावी*

*या आशेने दिवस-रात्र बापा माझा काळ्या ढेकळाशी इमान राखतात....*


*अस वाटतेय आता परत बळी चे राज्य यायला हव*

*म्हणजे कोणताच शेतकरी मरणाची वार्ता करणार नाही....*

*इतका समृद्ध झाला पाहिजे माझा शेतकरी राजा कि*

*पैसा-अभावी कधीच कोणत्या शेतकऱ्याची आत्महत्या इथे घडणार नाही....*


*युवा विद्रोही कवी :-*

*निखिल कैलासराव खडसे*

*तळेगाव (शा. पंत)*

*8459167410*

Comments