गुलामीत जगलेल्या क्षणाची साक्षीदार असलेली ही कविता| poet sanket waghamare


 गुलामीत जगलेल्या क्षणाची साक्षीदार असलेली ही कविता.....

ती बेरोजगारी, ती उपासमारी,

ती गरिबी, त्या जातीयवादी दंगली,

त्या सीमेवरच्या जवानांचे बेवारस

गेलेले प्राण,

माणसां-माणसात फूट पाडून जातीयवाद

पेटवण्यापर्यंतचा हा प्रवास.....

संविधानाला जाळण्याचा केलेला प्रयास

सरकारी शाळा बंद करण्याचा ध्यास

कंपन्या खाजगीकरण करण्याचा विश्वास

कामगार,कष्टकऱ्यांवर अन्यायांचे भडीमार.


पण भूतकाळात केलं मात्र गुंजन,

माणूस माणसापासून दूर जाण्याचं,

जो कुणाचे विचार ऐकून घ्यायला

सुद्धा तयार नाही.

माझाही डोळा का लागला नेमका त्या क्षणात आणि यांनी पण का घेतलं सोंग गांधारीसारखं........


देशावर कर्ज झाल्याचं, देश बुडाल्याचं, दुःख करत नसतात म्हणे...

आणि यांनी सुद्धा नाही केलं.....

कारण देश बुडल्याचं यांनी कळूच दिलं नाही आम्हाला.

आक्रोश.... खूप आक्रोश.

पण एक हुंदका अजूनही आहे माझ्या मनात दाटलेला...

अगदी खोल... खूप खोल

खोलातल्या अंधार पोकळीत थरथरतो तो नेहमी,

मी खोकत असतो नेहमी तेव्हा....

तो हुंदका बाहेर येत असतो....

काहीतरी नवीन शब्द घेऊन कवितेच्या रूपात....


पण खरं सांगू का तुम्हाला, या जातीयवादी देशद्रोहाच्या दंगली माझ्या डोळ्यांनी पाहवत नाही आता....

तरुणांच्या चळवळीचा आवाज घणघणत

असतो नेहमी माझ्या कर्णपटलावरून,

त्या जातीयवादी सरकारचं धोरण पटत नाही आता माझ्या मनाला,

आमचे नेते बोलत नाही आता फारसे आरस्यासारखे......

रस्त्यावर उतरणारी तरुणांची चळवळ,

कुणीतरी बंद करण्याच्या मार्गांवर आहे,

उंच दीपाचा उजेड हल्ली अंधुकसा,

दिसू लागलाय मला.....

आणि माणसातलं अंतर वाढवलंय या अंधाराने...


पण आता आपण देश आणि संविधान वाचवण्याच्या,चळवळी मात्र उभ्या केल्या पाहिजे.

अन्याय,अत्याचारविरुद्ध असलेली चळवळ

रोजगार मिळवण्यासाठी असलेली चळवळ

असं मुळात वेगळं काहीच नसतं....

म्हणून आता प्रत्येकाने सावध झालं पाहिजे


हंगामी चळवळी करीत असतांनी मी,

राहिलो असतो चार लोकांच्या मनात,

समतेची आणि समानतेची घुंगर काठी बनून.....

आणि कैद झालो असतो कायमचा,

या सरकारच्या मुठीत..........

पण एक सांगू का,


गुलामीत जगलेल्या हंगामी क्षणाची साक्षीदार असलेली ही कविता.

गुलामीत जगलेल्या हंगामी क्षणाची साक्षीदार असलेली ही कविता.....


संकेत वाघमारे

जहागीरपुर (अमरावती )

7448055501

प्रतिक्रिया जरूर कळवा....

Comments