Three day district level military training camp and grand salute march organized by Samata Sainik Dal*


 *भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त*

*समता सैनिक दलाचे तीन दिवसीय जिल्हास्तरीय सैनिकी प्रशिक्षण शिबिर व भव्य सलामी मार्च आयोजन*


वर्धा:स्थानिक जयभीम बुद्ध विहार,सिंदी(मेघे) वर्धा येथे भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे दिनांक 30 डिसेंबर 2022 ते दिनांक 1जानेवारी 2023 ला तीन दिवसीय सैनिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    दिनांक 1 जानेवारी 2023 ला सकाळी 10 वाजता भव्य सलामी मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. सलामी मार्चची सुरुवात बलभीम व्यायाम शाळा सिंदी (मेघे) येथून होईल,बजाज चौक ते झाँसी राणी चौक व सलामी मार्चचा समारोप शपथ विधिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळयाजवळ करण्यात येईल.

     या तीन दिवसीय शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रदीप कांबळे, मो.क्र.८८८८९४२७००,मनोज थुल मो.क्र.९८८१६१०७७६ यांच्याशी संपर्क साधावा. 

    तरी या शिबरात व सलामी मार्चमध्ये जनतेने बहुसंख्येने समील होण्याचे आवाहन समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, वर्धा तालुका संघटक मनोज थुल, आर्वी तालुका संघटक प्रफुल्ल काळबांडे, मार्शल मारोतराव डंभारे पहेलवान,ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिक गाडगे, मार्गदर्शक दिगांबर लांबे,कोषप्रमुख धम्मपाल ढोबळे,अमरावती ट्रेनिंग आँफिसर सुशील मेश्राम, मार्शल चंदू भगत,मार्शल अमोल ताकसांडे,मार्शल पप्पू पाटील,मार्शल दिपके हूके, मार्शल वंदनाताई वासनिक, मार्शल प्रितीताई आष्टेकर,मार्शल सुनिताताई डंभारे, मार्शल सुमनताई बागडे,भारतीताई बन्सोड (आर्वी),मार्शल नम्रताताई थुल आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Comments