कविता|आजचा युवक| कवी निखिल खडसे|358VTN
*आजचा युवक*
*युवकांच्या माथी कळस बेरोजगारीचा*
*नेत्यांच्या खिशाला पेन लाखांचा आहे.*
*लोकशाहीला होरपळून जन्मतात हुकूमशाही*
*तरी म्हणायचं देश प्रजासत्ताक आहे.*
*जनतेच्या हाती सत्ता*
*कधी दिसलीच नाही*
*चार अब्जपती मिळवून हिशोब*
*अर्थव्यवस्थेचा करतात*
*आणून देशात तीन कायदे हिताचे*
*म्हणून कित्येक शेतकरी मारतात*
*नवनवीन तरतुदीच्या नावाने*
*तुरी जनतेच्या हाती दिले जाते*
*लोकशाहीचा दाबूनी गळा*
*संविधानात बदल केले जाते*
*संविधानात बदल केल्याने*
*काहीच होणार नाही....*
*बदल नेत्यांच्या नियतीमध्ये झाला पाहिजे*
*उठवूनी चिखलातला ऐरावत आजचा*
*युवक सत्तेत आला पाहिजे*
*संविधानिक प्रत्येक चौकटीचा*
*त्याने आदरकर्ता व्हावा*
*बेरोजगार महागाईचा स्वतंत्र ठराव*
*संसदेमध्ये तो सादरकर्ता असावा*
*त्यांच्या कल्पकतेने उडान*
*भर आकाशात घ्यावी*
*डिजिटल इंडियाची एक झाकी*
*त्याने सत्यामध्ये उतरावी....*
*युवकांच्या सत्तेत एकही तरुण*
*बेरोजगार मात्र राहू नये..*
*नासाच्या राफेल ला त्याने*
*कधीच लिंबू मिर्ची बांधू नये..*
*विज्ञानाच्या युगात उर थोतांडाचा*
*वास्तवातच बंद झाला पाहिजे*
*देऊन माती अंधश्रद्धेला आजचा*
*युवकच सत्तेत आला पाहिजे*
*युवा कवी :-*
*निखिल कैलासराव खडसे*
*तळेगाव (शा. पंत)*
*8459167410*
Comments
Post a Comment