माझी भीमकन्या कशी असावी
💙🌟💙🌟💙🌟💙🌟💙🌟💙🌟💙🌟
नको तिला रेशमी वस्त्रे, नको तिला उंची शान,
माझी भीम कन्या असावी, ज्ञानाची खाण.
हातात नसोत जरी तोडे, पुस्तकांचे वजन असो,
विचारांची क्रांती तिच्या, शब्दांमधून वसो.
नसो तिला नाजुक चाहुल, कणखर तिची पाऊले,
अन्यायाविरुद्ध गर्जणारी, हिम्मतीची ती माऊली.
नसो तिला मेकअपची हाव, साधेपणाचा साज असो,
बुद्ध आणि भीमाचा विचार, तिच्या मनात नित्य वसो.
नसो तिला Status चा मोह, कर्तृत्वाची उंची गाठो,
गरजूंच्या मदतीला धावणारी, माणुसकीचा पाठ असो.
नसो तिला जात-धर्माचा अभिमान, माणूस म्हणून ओळख,
सर्वांशी प्रेमाने वागणारी, ममतेची ती मूर्ती देख.
शिकून मोठी व्हावी ती, आपल्या पायावर उभी राहो,
हक्कासाठी लढण्याची ताकद, तिच्या नसानसात वाहो.
माझी भीम कन्या असावी, तेजस्विनी, प्रेरणादायी,
पिढ्यानपिढ्यांसाठी आदर्श, अशी ती भाग्यदायी.
💙🌟💙🌟💙🌟💙🌟💙🌟💙🌟💙🌟💙🌟
Comments
Post a Comment